JOIN US
मराठी बातम्या / देश / भारतात ठणठणीत बरा झालेला कोरोनाग्रस्त ब्रिटिश नागरिक म्हणाला, 'इंग्लंडमध्ये...'

भारतात ठणठणीत बरा झालेला कोरोनाग्रस्त ब्रिटिश नागरिक म्हणाला, 'इंग्लंडमध्ये...'

पर्यटनासाठी आलेल्या ब्रिटिश नागरिकाला कोरोना झाल्यानंतर त्याच्यावर भारतातच उपचार कऱण्यात आले. त्यानंतर त्याने या काळातला अनुभव सांगितला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोच्ची, 05 एप्रिल : भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. देशता महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांत कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 600 च्या वर पोहोचली आहे. त्याखालोखाल केरळचा नंबर लागतो. इथं मृतांचे प्रमाण मात्र कमी आहे. केरळमध्ये आतापर्यंत 60 हून अधिक रुग्ण ठणठणीत होऊन घरी गेले आहेत. कोरोना व्हायरसच्या संसर्गातून मुक्त झालेल्यांमध्ये पठानमथिट्टा इथले सर्वात वृद्ध दाम्पत्य थॉमस आणि मरियाम्मा हे आहे. थॉमस यांचे वय 93 तर मरियाम्मा यांचं वय 88 आहे. केरळ मध्ये 7 परदेशी नागरिकांवरसुद्धा उपचार कऱण्यात आले. यात ब्रिटिश नागरिक ब्रायन लॉकवूड यांचाही समावेश आहे. पत्नीसह 18 लोकांसोबत ब्रायन केरळ टूरवर आले होते. दुबईला जाण्याआधी कोट्टायम इथं ब्रायन थांबला होता. त्यावेळी तापामुळे त्याची कोरोना टेस्ट कऱण्यात आली. तेव्हा चाचणीचा रिपोर्ट येईपर्यंत त्याला आणि पत्नीला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर 14 मार्चला टेस्ट निगेटिव्ह असल्याचं सांगितलं गेलं. पण दुसऱ्या दिवशी जाण्याची तयारी करत असतानाच ब्रायनची टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचं सांगण्यात आलं. रुग्णालयात नेत असताना मला भीती वाटली होती. तिथं आमची टेस्ट केली. एक्स रे काढण्यात आले. ज्यात मला न्यूमोनिया झाल्याचं दाखवण्यात आलं. डॉक्टरांनी लगेच उपचार सुरु केले. त्यांनी मला औषधउपचाराची माहिती दिली. त्यानंतर माझी तब्येतही बिघडली तेव्हा व्हेंटिलेटरवर ठेवलं. त्यामुळेच मी बरा झालो असं ब्रायनने ‘आज तक’शी बोलताना सांगितलं. हे वाचा : एकावेळेला 25-30 पोळ्यांचा सुरु आहे खुराक, तबलिगी सदस्यांमुळे कर्मचारी त्रस्त उपचारावेळचा अनुभवही ब्रायनने कथन केला आहे. व्हायरस पसरू नये यासाठी तिथं डॉक्टर कठोर भूमिका घेत होते. ते गरजेचं होतं. आयसोलेशन रुमला सॅनिटाइज केलं जात होतं. रुग्णांच्या आणि बाहेर असलेल्या लोकांच्या आरोग्यासाठी ते करणं आवश्यक होतं असं ब्रायन म्हणाला. स्थानिक रुग्णालय असल्यानं याठिकाणी पाश्चिमात्य जेवण मिळत नव्हतं. पण डॉक्टरांकडून पर्यायी व्यवस्था काय आहे याची माहिती दिली जात होती. त्यांच्याकडून अत्यंत शांत आणि नम्रपणे रुग्णांची देखरेख केली जात होती. इतके चांगले डॉक्टर मी कधीच पाहिले नाहीत. आमच्या देशातही असे उपचार झाले नसते असंही ब्रायन म्हणाला. हे वाचा : लेकींच्या खांद्यावरून बापाचा शेवटचा प्रवास, मुलींनी केले अंत्यसंस्कार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या