JOIN US
मराठी बातम्या / देश / या आकड्यांनी भरली केंद्र सरकारला धडकी, कोरोनाच्या मोठ्या उद्रेकाची भीती

या आकड्यांनी भरली केंद्र सरकारला धडकी, कोरोनाच्या मोठ्या उद्रेकाची भीती

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून आज विक्रमी रुग्णांची नोंद झाली. संख्या वाढत असल्याने सरकार आणि राज्य हादरून गेलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली14 मे: देशातल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. देशातला हा आकडा आता 80,759वर पोहोचला आहे. त्यामुळे केंद्र सरकारला धडकी भरली आहे. भारतासाठी आता मे आणि जून महिला निर्णयाक ठरणार आहे. गेल्या दोनच दिवसांमध्ये तब्बल १० हजार रुग्णांची भर पडली आहे. देशातल्या ११ राज्यांमधल्या रुग्णांची संख्या एकत्रित केल्यानंतर तो आकडा ८० हजारांच्या वर गेलाय. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. लॉकडाऊन असताना ही परिस्थिती आहे. तर जेव्हा लॉकडाऊन शिथील केलं जाईल तेव्हा कशा प्रकारचा उद्रेक होईल याविषयी आता तज्ज्ञ अंदाज बांधण्याचं काम करत आहेत. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून आज विक्रमी रुग्णांची नोंद झाली. संख्या वाढत असल्याने सरकार आणि राज्य हादरून गेलं आहे. आज राज्यात १६०२ नवे रुग्ण सापडले. तर राज्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या आकड्यानं हजाराचा टप्पा ओलांडला आहे. रुग्णाची एकूण संख्या ही २७५२४ वर गेली आहे. आज राज्यात ४४ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूची एकूण संख्या १०१९ वर गेली आहे. मुंबईत आज तब्बल ९९१ रुग्णांनी वाढ झाली. तर आज ५१२ जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. मुंबईत आज 998 नवे कोरोना रुग्ण आढळले असून कोरोनाच्या एकूण रुग्णाची संख्या 16579वर पोहचली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची चीनला सर्वात कठोर धमकी, तर अमेरिका हे टोकाचं पाऊल उचलणार आज कोरोणामुळे 25लोकांचा मृत्यू झाला असून आजवर मुंबईत एकूण 621 जणाचा मृत्यू झाला आहे. आज 443जण कोरोनमुक्त झाले असून आजवर 4234 पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. खळबळजनक! पाण्याच्या वादावरून पाजलं मूत्र, वैतागून तरुणाने संपवलं आयुष्य मुंबई महापालिकेने राज्य शासन आणि केंद्र सरकारने दिलेल्या आदेश नुसार कोविड 19 आजाराच्या तपासणीनंतर नव्या मार्गदर्शक तत्व जरी केली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या