वॉशिंग्टन 14 मे: अमेरिका आणि चीनमधला वाद आणखी भडकण्याची चिन्हे आहेत. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला पुन्हा एकदा कठोर धमकी दिलीय. परिस्थिती अशीच राहिली तर अमेरिका चीन विरुद्ध कठोर पावलं उचलू शकते असं ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. म्हणजे अमेरिका नेमकं काय करणार असं विचारल्यावर ट्रम्प म्हणाले, अमेरिका चीनसोबतचे सर्व संबंध तोडून टाकू शकते. ट्रम्प यांच्या या दाव्यानंतर जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
ट्रम्प हे वारंवार चीनविरुद्ध वक्तव्य करत असून चीननेच हा व्हायरस पसरवला असा त्यांचा आरोप आहे. मात्र चीनने अमेरिकेचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
दरम्यान, चीनच्या वुहानपासून जगभरात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना पसरण्यास सुरुवात झाली. चार महिन्यांनंतरही कोरोनावर कोणतीही लस किंवा ठोस उपाय शोधता आलेला नाही आहे. यातच जागितक आरोग्य संघटनेने (WHO) काही दिवसांपूर्वी लवकरच कोरोनाची लस मिळेल, असे सांगत एक आशेचा किरण दाखवला. मात्र आता WHOने कोरोना कधीच नष्ट होणार नसल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. WHOने स्पष्ट केले आहे की, असेही होऊ शकते की कोव्हिड-19 कधीच नष्ट होणार नाही. त्याच्यासोबत जगायची सवय लावून घ्यावी लागेल.
कोरोनाविरोधात हर्ड इम्युनिटी ठरू शकते जीवघेणी, WHO ने केलं सावध