आग्रा, 14 मे : लॉकडाऊनमुळे अनेक मजुरांचे हाल झाले आहेत. आपल्या मूळ गावी जाण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं धडपड सुरू आहे. आपल्या मूळ गावी परत जाणाऱ्या या मजुरांचे मार्मिक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहेत. कुणी कडेवर 9 महिन्यांचं जीव घेऊन चालताना तर कोणी उन्हानं पाय भाजू नये म्हणून पाण्याच्या बाटल्या बांधून गावी जाण्यासाठी निघाले आहेत. उत्तर प्रदेशातील आग्रा इथला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चिमुकला बॅगवर झोपला आहे आणि ती बॅग ओढत रस्त्यावरून चालत आहेत. हा चिमुकला चालून थकल्यामुळे तो सूटकेसवर झोपला. तशाच अवस्थेत ही महिला ती बॅग ओढत पायी प्रवास करत आहे. ही दृश्य डोळ्यात अश्रू आणणारी आहेत.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता पायी प्रवास करणाऱ्या मजुरांमध्ये आईनं आपल्या थकलेल्या चिमुकल्याला सुटकेसवर झोपवलं आहे. या सुटकेसला दोरीनं खेचत असल्याचं दिसत आहे. या महिलेला झांसी इथे जायचं आहे. लॉकडाऊनमुळे काम गेला त्यामुळे खाण्याचा प्रश्न आला. मूळ गावी जाण्यासाठी या महिलेकडे पैसे नव्हती म्हणून पायी चालत निघाली. हे वाचा- Lockdown : दोन महिन्यांनी दुकान उघडताच बसला धक्का, अशी झाली होती अवस्था लॉकडाऊनमध्ये एक बैल कमी पडला म्हणून गाडीला स्वत:ला जुंपलं इंदौरमध्ये एका बैलावर गाडी हाकणं कठीण झालं म्हणून मजुरानं बैलासोबत बैलगाडीला जुंपलं आणि त्या बैलगाडीतून आपल्या कुटुंबीयांना घेऊन गावी परत जाण्यासाठी निघाला. लॉकडाऊनमध्ये भर उन्हातून बैल आणि मजूर गाडी ओढत होते. हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. बैलासोबत गाडी ओढत असलेल्या या मजुराचं नाव राहूल आहे. हा महूचा रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी कामधंद्यासाठी तो इंदौरमध्ये आला होता. त्यानं 15 हजार रुपये देऊन बैलगाडी विकत घेतली आणि हमाली सुरू केली. मात्र याच दरम्यान कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हमाली बंद झाली. घरातील पैसेही संपले मग पर्याय नाही म्हणून एक बैल विकला. एका बैलावर गाडी कशी चालवायचा हा प्रश्न समोर होता. 15 हजाराला घेतलेला बैल केवळ 5 हजाराला विकावा लागला. मजबुरीनं पोट भरण्यासाठी आता एकाबैलासह स्वत:ला जुंपून गाडी चालवणं सुरू आहे. हे वाचा- रेल्वेकडून सगळ्यात मोठी चूक, स्पेशन ट्रेनमधून 5 लोकांनी विनातिकीट केला प्रवास हे वाचा- VIDEO : लॉकडाऊनमध्ये पोटापाण्यासाठी ‘या’ तरुणानं केला महागातला जुगाड! संपादन- क्रांती कानेटकर