JOIN US
मराठी बातम्या / देश / धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये अडवलं म्हणून पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेलं, पाहा VIDEO

धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये अडवलं म्हणून पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेलं, पाहा VIDEO

लॉकडाऊनमध्ये बाहेर फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी मिल्क बर चौकात अडवलं. त्यानंतर तरुणानं काय केलं पाहा VIDEO

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जालंधर, 02 मे : देशभरात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. पंजाबमध्ये लॉकडाऊनचे नियम कठोरपणे पाळले जात आहेत. या लॉकडाऊनमध्ये बाहेर फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी मिल्क बर चौकात अडवलं. या तरुणानं न थांबता गाडीचा स्पीड वाढवला. पोलीस कर्मचाऱ्याला या तरुणानं काही अंतरापर्यंत घासत नेलं आहे. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या तरुणानं स्पीड वाढवल्यानं पोलीस कर्मचारी गाडीच्या बोनेटवर आपटला आणि काही अंतर तसाच घसरत जास असतानाही चालकानं गाडी रोखली नाही. पोलिसांनी पळत जाऊन या तरुणाला अडवलं आणि त्याला पकडलं आहे. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं असून दोन कानशिलात लगावल्या. लॉकडाऊनचे नियम न पाळल्यानं आणि पोलीस कर्मचाऱ्याला अशा पद्धतीनं गाडीसोबत परफटत नेल्यानं त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

पंजाबमध्ये लॉक़डाऊन आणि कर्फ्यू 17 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. पंजाबमधील तीन जिल्हे रेड 15 जिल्हे ऑरेंज झोनमध्ये आहेत. जालंधर, पटियाला, लुधियाना या तीन ठिकाणी रेड झोन आहे. या भागांमध्ये कोरोनाचा धोका सर्वाधिक आहे. मागच्या 24 तासांत देशभरात 2 हजार 293 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर कोरोनागग्रस्तांचा देशातील आकडा 37 हजार पार गेला आहे. हे वाचा- मुंबई, ठाणे, पुण्यात रेड झोनमध्ये काय सुरू काय बंद? अशी आहे नवी नियमावली हे वाचा- श्रमिक स्पेशल ट्रेनसाठी रेल्वेनं जारी केले निर्देश, फक्त हेच लोक करणार प्रवास संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या