जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / मुंबई, ठाणे, पुण्यात रेड झोनमध्ये काय सुरू काय बंद? अशी आहे नवी नियमावली

मुंबई, ठाणे, पुण्यात रेड झोनमध्ये काय सुरू काय बंद? अशी आहे नवी नियमावली

या दुहेरी कामगिरीमुळे उपचार सुरु असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्यादेखील आता कमी होऊ लागली आहे. आजपर्यंत मुंबईत 1 लाख 10 हजार 846 रुग्ण आढळले, पैकी 83 हजार 97 रुग्ण बरे होऊन परतले आहेत.

या दुहेरी कामगिरीमुळे उपचार सुरु असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्यादेखील आता कमी होऊ लागली आहे. आजपर्यंत मुंबईत 1 लाख 10 हजार 846 रुग्ण आढळले, पैकी 83 हजार 97 रुग्ण बरे होऊन परतले आहेत.

यावेळी लोकांच्या फायद्याचा आणि देशाची आर्थिक कोंडी सोडवण्याचा विचार करता लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. त्यासाठी प्रशासनाकडून काही नियमावली तयार करण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 02 मे : कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला आहे. अशात या संसर्गजन्य रोगाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येनुसार झोन तयार करण्यात आले आहेत. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रामध्ये आहे. यामध्ये मुंबई, ठाणे आणि पुणे रेड झोनमध्ये आहेत. म्हणजेच या शहरांमध्ये कोरोनाचा सगळ्यात जास्त धोका आहे. त्यामुळे 3 मेपर्यंत असलेला लॉकडाऊन सरकारने दोन आठवड्यांसाठी वाढवला आहे. दरम्यान, यावेळी लोकांच्या फायद्याचा आणि देशाची आर्थिक कोंडी सोडवण्याचा विचार करता लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. त्यासाठी प्रशासनाकडून काही नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार जाणून घेऊयात कुठे काय सुरू आणि काय असणार बंद? देशभरात सर्व झोन्समध्ये काय राहणार बंद - विमान सेवा - रेल्वे सेवा - एका राज्यातून दुसऱ्या राज्यात होणारी रस्ते वाहतूक - शाळा, कॉलेजेस, क्लासेस - हॉटेल, रेस्टॉरंट - सार्वजनिक ठिकाणी गर्दी होतील अशी सर्व ठिकाणे बंद - सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतीक कार्यक्रमांना बंदी - चित्रपटगृहं - मॉल - व्यायामशाळा - स्पोर्ट्स कॉमप्लेक्स रेड झोनमध्ये मुभा - स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने चालकासह कमाल दोघांना वाहनातून जाण्यास परवानगी. - दुचाकीवर दोन व्यक्तींना परवानगी. - औषधनिर्मिती, कच्चा माल प्रक्रिया, आयटी हार्डवेअर, बांधकामे. - जीवनावश्यक आणि बिगरजीवनावश्यक वस्तूंची स्वतंत्र दुकाने. - ई-कॉमर्सद्वारे जीवनावश्यक सेवांनाच परवानगी. - वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांचे व्यवहार. - सरकारी आणि खासगी कार्यालये खुली राहतील. 33 टक्के कर्मचारी काम करतील - शेती आणि कुक्कुटपालन - बँक, विमा आदी वित्तीय संस्था. - व्यापारी व खासगी कार्यालये, संस्था. - अंगणवाडी, ज्येष्ठ नागरिक, परित्यक्ता, महिलांसंबंधी संस्था. ऑरेंज झोनलाही रेड झोन प्रमाणेच नियम असतील. फक्त तिथे टॅक्सी आणि रिक्षा सेवेला मुभा देण्यात आली आहे. टॅक्सी आणि अ‍ॅपवरील टॅक्सीसेवा, चालक आणि दोन प्रवासी, आंतरजिल्हा प्रवास. पण, स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तर चारचाकी गाड्यांमध्ये जास्तीत जास्त चालकासह दोन व्यक्तींना मुभा देण्यात आली आहे. ग्रीन झोनमध्ये सर्व देशभरात लागू होणारी बंधनं राहणार आहेत. मात्र तिथे 50 टक्के बस चालवाव्यात अशा सुचना देण्यात आल्या आहेत. रेड झोनमध्ये या गोष्टींवर बंदी - रेड झोनमध्ये सायकल रिक्षा, ऑटोरिक्षा, टॅक्सी, टॅक्सी अॅपसेवा, आंतर जिल्हा आणि जिल्ह्य़ांतर्गत बससेवा, केशकर्तनालय, स्पा, सलून या सेवांवर बंदी. - बिगर जीवनावश्यक सेवा फक्त सकाळी 7 ते संध्या 7 सुरू राहील. गरज भासल्यास जमावबंदी लागू. - सर्व श्रेणींमध्ये 65 वर्षांहून अधिक वयोगटातील मधुमेह वगैरे गंभीर आजार असलेल्या व्यक्ती, गर्भवती महिला, लहान मुलांनी घरातच राहणे गरजेचे. - तीनही श्रेणीत बाह्य़रुग्ण विभाग सुरू राहतील. पण, नियंत्रित विभागात मात्र मुभा नाही. - वाइन शॉप्स, पानाची दुकानं फक्त ग्रीन झोनमध्येच उघडली जाणार - खरेदी करताना ग्राहकांनी सहा फुटांचं अंतर राखणं आवश्यक - एकावेळी शॉपमध्ये पाचपेक्षा जास्त लोक नकोत महाराष्ट्रातले किती जिल्हे ग्रीन झोनमध्ये महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 11 हजार 500हून अधिक आहे. त्यामध्ये मुंबईसह उपनगर, पुणे, औरंगाबाद, नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत देशभरात मृतांचा आकडा 1 हजार 152 वर पोहोचला आहे. तर उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, वर्धा हे जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत. संपादन - रेणुका धायबर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: corona
  • First Published :
जाहिरात
जाहिरात