JOIN US
मराठी बातम्या / देश / कोरोनाचा सर्वात भीतीदायक VIDEO, तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांवर तुफान दगडफेक

कोरोनाचा सर्वात भीतीदायक VIDEO, तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांवर तुफान दगडफेक

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये जवळपास 12 नवीन रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

इंदूर, 02 मार्च : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये जवळपास 12 नवीन रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा मध्य प्रदेशातील आकडा 75 वर पोहोचला आहे. या पैकी 8 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. 6 नवीन परिसरातील हे रुग्ण आढळल्यानं आता चिंता व्यक्त होत आहे. त्याच सोबत आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी तपासणीसाठी आलेल्या वैद्यकीय पथकावर तुफान दगडफेक केली. हे पथक बुधवारी दुपारी तपासणीसाठी तत्काळ बखल इथे दाखल झाली. याचा निषेध करत रहिवाशांनी पोलिसांचे बॅरिकेट तोडून टीमवर दगडफेक केली. यानंतर प्रकरण शांत करण्यासाठी पोलिस घटनास्थळी पोहोचले. वैद्यकीय पथक आणि स्थानिकांमध्ये सुरुवातीला बाचाबाची झाली. लोकांनी निषेध करत या पथकावर तुफान हल्ला केला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रुग्णाची संख्या वाढत असतानादेखील आपल्या चुकांमधून धडे घेणं मात्र इंदूरमधील नागरिकांना अद्याप उमगलंच नाही. 2 दिवसांपूर्वी राणीपुरा भागात वैद्यकीय पथकावर उर्मटपणे वागत त्यांच्या अंगावर थुंकल्याचा प्रकारही समोर आला होता. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता लोकांनी कशा पद्धतीनं हल्ला केला आहे. हे वाचा- 10 दिवस श्वासाशी संघर्ष; तरुणाने जिंकला कोरोनाविरोधात लढा, म्हणाला…

संबंधित बातम्या

कोरोना व्हायरसच्या संशयित रुग्णाची तपासणी कऱण्यासाठी हे पथक इंदूरमधील टाटापट्टी बाखल परिसरात पोहोचले. त्याचवेळी तिथल्या नागरिकांनी हुज्जत घालत त्यांच्यावर तुफान दगडफेक केली. लाठ्या-काठ्या आणि पाईप घेऊन तिथल्या नागरिकांनी वैद्यकीय पथकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात 2 डॉक्टर जखमी झाले आहेत. इंदूर आणि छतरीपुरा या परिसरात दगडफेक आणि मारहाण करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. हे वाचा- ‘दिल्लीसारख्या घटनेची पुनरावृत्ती महाराष्ट्रात नको, याची खबरदारी घ्या’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या