JOIN US
मराठी बातम्या / देश / कोरोनामध्ये पोलीस का ठरतायत देवदूत, हा VIDEO तुम्हीही म्हणाल 'एक नंबर साहेब'

कोरोनामध्ये पोलीस का ठरतायत देवदूत, हा VIDEO तुम्हीही म्हणाल 'एक नंबर साहेब'

लॉकडाऊनमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. एका वृद्धाचा पाय तुटला असताना त्याला तात्काळ रुग्णालयात पोहोचवणं गरजेचं होतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

होशंगाबाद, 18 एप्रिल : कोरोना व्हायरसनं देशभरात थैमान घातलं आहे. प्रशासनाकडून लॉकडाऊन कठोरपणे पाळण्यात येत आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी वारंवार घरी राहण्याचं आवाहन केलं जात आहे. याचदरम्यान बेघर, गरिब, वृद्ध व्यक्तींच्या मदतील पोलीस आणि अनेक सामाजिक कार्य कऱणारे तरुण समोर येताना दिसत आहेत. लॉकडाऊनमुळे वाहनं उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्णालयात किंवा रुग्णालयातून घऱी जाण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. याआधी गाडी नाही म्हणून एका तरुणानं आपल्या वडिलांना खांद्यावर उचलून घरी नेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. लॉकडाऊनमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. एका वृद्धाचा पाय तुटला असताना त्याला तात्काळ रुग्णालयात पोहोचवणं गरजेचं होतं. कोणतंही वाहन उपलब्ध न झाल्यानं या वृद्धाला दोन जणांनी मिळून हात गाडीवरून नेलं. काही अंतर गेल्यानंतर पोलिसांनी हा प्रकार पाहिला आणि पुन्हा एकदा पोलिसांनी मदतीचा हात पुढे केला आहे. या वृद्धाला आपल्या गाडीत बसवून तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. हे वाचा- Exclusive : एकेकाळी रक्ताने माखले होते हात, आज दुसऱ्यांचा वाचवतायत जीव

संबंधित बातम्या

कोरोनाव्हायरसचा धोका लक्षात घेता देशभरातील कोरोनाव्हायरस नियंत्रित करण्यासाठी लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. मध्य प्रदेशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाचे 1,308 रुग्ण आढळले आहेत, ज्यात आतापर्यंत 57 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 65 लोक या आजाराने बरे झाले आहेत. मध्य प्रदेशातील कोरोनामुळे इंदूरचा सर्वाधिक फटका बसला आहे. अनेक प्रयत्न करूनही कोरोनाचा संसर्ग कमी होण्याचं नाव घेत नाही. आतापर्यंत भारतात 13 हजार 800 हून अधिक लोकांना लागण झाली आहे. तर 452 लोकांचा मृत्यू झाला आहे. 24 तासांमध्ये 1076 नवीन केसेस पॉझिटिव्ह केसेस समोर आल्या आहेत. तर आतापर्यंत 1 हजार 767 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. हे वाचा- कोरोनाचं हॉटस्पॉट झालेल्या मालेगावात ‘या’ कारणामुळे वाढली प्रशासनाची डोकेदुखी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या