JOIN US
मराठी बातम्या / देश / Covid-19 : 24 तासात कोरोना रुग्णांत विक्रमी वाढ, जगात भारत 7व्या क्रमांकावर

Covid-19 : 24 तासात कोरोना रुग्णांत विक्रमी वाढ, जगात भारत 7व्या क्रमांकावर

भारतात कोरोना रुग्णांची संख्या 1,90,535 वर पोहोचली आहे. एकूण मृत्यू 5394 आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत 91,819 लोकांना डिस्चार्ज देण्यात आल आहे.

जाहिरात

पावसाळ्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत घरातदेखील चप्पल घालण्याचा प्रयत्न करा. पण घरातली आणि बाहेर घालण्याची चप्पल वेगळी ठेवा. वेळोवेळी घर, घरातल्या वस्तू, दारं-खिडक्या स्वच्छ ठेवा, घराचा मजला साफ ठेवा आणि दारे आणि खिडक्या खुल्या ठेवण्याचा प्रयत्न करा.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 01 जून : देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूची 8392 नवीन प्रकरणं समोर आली आहेत. याशिवाय एका दिवसात 230 रुग्णांचा मृत्यू झाला. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना रुग्णांची संख्या 1,90,535 वर पोहोचली आहे. एकूण मृत्यू 5394 आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत 91,819 लोकांना डिस्चार्ज देण्यात आल आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांच्या यादीत भारत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. देशात या विषाणूचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात 65 हजाराहून अधिक कोरोना संक्रमित रूग्णांची पुष्टी झाली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत राज्यात 67655 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यापैकी 36040 रूग्णांवर उपचार सुरू आहेत तर 29329 लोक बरे झाले आहेत. त्याच वेळी, 2286 लोक मरण पावले आहेत. राष्ट्रीय राजधानीत एकूण 19844 प्रकरणं आहेत, त्यापैकी 10893 सक्रिय रूग्ण आहेत. त्याच वेळी 8478 लोक बरे झाले आहेत. 473 लोक मरण पावले आहेत. मध्य प्रदेशात 8089 प्रकरणांमध्ये 2897 सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी 4842 लोक बरे झाले आहेत, तर 350 लोक मरण पावले आहेत.

संबंधित बातम्या

पुणेकरांना आता पडता येणार बाहेर, असे असतील नवे नियम आणि अटी उत्तर प्रदेशात कोरोना रूग्णांची संख्या 7823 वर पोहोचली आहे. 213 लोक मरण पावले आहेत. बिहारमधील 3815, चंडीगडमध्ये 293, छत्तीसगडमध्ये 498, गोव्यात 70, हरियाणामध्ये 2091 रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर झारखंडमध्ये कोरोना रूग्णांची संख्या 610 वर पोहोचली आहे. सगळ्यात जास्त रूग्ण असणाऱ्या मुंबईकरांना मिळाला दिलासा, पालिकेनं दिली आनंदाची बातमी कोरोना संसर्गामुळे गुजरातलाही मोठी बाधा झाली आहे. राज्यात आतापर्यंत 16779 रुग्ण आढळले आहेत. मृतांची संख्या 1038 आहे. तमिळनाडूमध्ये 22333 कोरोना प्रकरणे आहेत. यापैकी 9403 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत 173 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रावर आणखी एक संकट, या राज्यांना 3 जूनपर्यंत दिला सतर्कतेचा इशारा संपादन - रेणुका धायबर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या