JOIN US
मराठी बातम्या / देश / 'तुमचा तर मृत्यू झालाय', जनधनचे पैसे आणायला बँकेत गेल्यावर महिलेला मिळालं धक्कादायक उत्तर

'तुमचा तर मृत्यू झालाय', जनधनचे पैसे आणायला बँकेत गेल्यावर महिलेला मिळालं धक्कादायक उत्तर

लॉकडाऊनमध्ये हातात काहीच उरलेलं नाही आणि त्यातच महिलेला स्वत: जिवंत असल्याचं सिद्ध करावं लागणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पटना, 20 एप्रिल : एखाद्या जिवंत माणसाला कुणी सांगितलं की तुझा मृत्यू झालाय तर एकतर सांगणाऱ्याला वेडा ठरवतील किंवा ते ऐकणाऱ्याला. पण असं एका वृद्ध महिलेला बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं. बिहारमधील छपरा जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. धवरी टोला गावातील महिला लॉकडाऊनच्या काळात जनधन खात्यावर आलेले पैसे काढायला गेली होती. चानो देवी असं या महिलेचं नाव असून बँकेच्या कर्मचाऱ्यांनी तिला तुझा मृत्यू झाला आहे असं सांगितलं आहे. आता चानोला जिवंत असल्याचा पुरावा द्यावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे चानोला पैशांची चणचण होती. त्यातच तिला माहिती मिळाली की खात्यावर पैसे मिळणार आहेत. त्यासाठी ती सोमवारी बँकेत गेली होती. चानो देवी पैसे काढण्यासाठी पोहोचली मात्र तिला अशी माहिती मिळाली की तिचं खातं बंद झालं आहे. कारण विचारताच समजलं की, तिचा मृत्यू झाला असल्यानं खातं बंद करण्यात आलं आहे. हे वाचा- पोलीस इंस्पेक्टरने स्वत:च्या मुलांना घातल्या गोळ्या; एकाचा मृत्यू, दोन तरुणी जखम बँकेनं दिलेल्या उत्तरानंतर चानो देवी यांना काहीच समजेना. लॉकडाऊनमध्ये हातात काहीच उरलेलं नाही आणि आता स्वत:ला जिवंत असल्याचं पुराव्यासह सिद्ध करावं लागणार आहे. शेवटी चानो देवी यांनी बँकेला पुन्हा विचारलं की, त्यांना मृत कसं ठरवलं आणि कोणी? तेव्हा अशी माहिती समोर आली की, गावच्या महिला सरपंच पूनम देवी यांनी त्यांच्या मृत्यूचं प्रमाणपत्र सादर केलं होतं. सरपंचांच्या लेटरहेडवर लिहिण्यात आलं होतं की, 9 ऑक्टोबर 2019 ला मृत्यू झाला आहे. सगळा प्रकार घडल्यानंतर लेटरहेडबाबत सरपंच पूनम देवी यांना विचारल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. त्यांनी सांगितलं की, ही चूक त्यांच्या लहान मुलानं केली आहे. आता त्या मुलानं सही कशी केली आणि ते लेटर बँकेकडं कसं पोहोचलं हा प्रश्न आहे. अजुन याबाबत कोणती कारवाई झाली नसली तरी चानो देवी यांना मदत मिळावी यासाठी बँकेकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली जात आहे. त्यांच्या आदेशानंतर खातं पुन्हा सुरू करण्यात येईल. हे वाचा- बाल्कनी, एक चिठ्ठी आणि लॉकडाऊन! पहिल्या नजरेत तरुणी घायाळ, असा सुरू झाला रोमान्स

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या