JOIN US
मराठी बातम्या / देश / VIDEO : जीव धोक्यात घालून कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टरांचे आमदाराने धरले पाय, मानले आभार

VIDEO : जीव धोक्यात घालून कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टरांचे आमदाराने धरले पाय, मानले आभार

अरियांकुप्पम विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस आमदार टी. जयमूर्ती यांनी कोरोनाविरूद्ध लढा देणार्‍या डॉक्टरांचं कौतुक केलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पदुचेरी, 24 एप्रिल : देशात कोरोनाग्रस्तांची संख्या जवळपास 21 हजार 700 वर पोहोचले आहे. कोरोनाचं संक्रमण थांबवण्यासाठी आरोग्य सेवेचे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून सेवा करत आहेत. देशात काही ठिकाणी याच कोरोना योद्धांवर हल्ले होत आहेत तरीही डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी आपलं कर्तव्य करणं सोडलं नाही. कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरचे एका आमदारानं पाय धरले. या आमदाराला वाकून नमस्कार केला आणि त्याचे आभारही मानले. त्यांच्याप्रति सन्मान व्यक्त केला आहे. पदुचेरीच्या अरियांकुप्पम विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस आमदार टी. जयमूर्ती यांनी कोरोनाविरूद्ध लढा देणार्‍या डॉक्टरांचं कौतुक केलं आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्ण बरे व्हावे म्हणून धडपडणाऱ्या डॉक्टरांचे पाय धरले. त्यांना नमस्कार करून त्यांचा सन्मान केला आहे. हे वाचा- कोरोना व्हायरस : पुण्यातील 5 महत्त्वाच्या अपडेट्स एका क्लिकवर

संबंधित बातम्या

लॉकडाऊनच्या आदेशाचं उल्लंघन करणार असला तर किराणा आणि भाजी मार्केटची दुकानं 2 दिवसात एकदा उघडण्याचे आदेश दिले जातील. त्यामुळे लॉकडाऊनचं नियमित पालन करा. भारतात दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत एक हजार 684 कोरोनाच्या नव्या केसेस समोर आल्या आहेत. तर देशभरात 37 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा देशभरात आकडा 23 हजारवर पोहोचला आहे. त्यापैकी 17 हजार 610 जणांवर देशभरात उपचार सुरू आहेत. दिलासा देणारी बाब म्हणजे 4 हजार 749 रुग्ण बरे झाले असून त्यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून घरी सोडलं आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. हे वाचा- धक्कादायक! एकाच दिवशी 3 जवानांनी वापरलं ATM, आता कोरोनानं केलं शिकार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या