Home /News /national /

धक्कादायक! एकाच दिवशी 3 जवानांनी वापरलं ATM मशीन, आता कोरोनानं केलं शिकार

धक्कादायक! एकाच दिवशी 3 जवानांनी वापरलं ATM मशीन, आता कोरोनानं केलं शिकार

जवानांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या 28 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

    वडोदरा, 24 एप्रिल : गुजरातच्या वडोदरामध्ये 3जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हा जवानांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार ATM मशीनमधून यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. एकाच दिवसात तिन्ही सैनिकांनी एकाच ATMमधून पैसे काढले होते. तीनही सैनिकांना एटीएममुळे संसर्ग झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जवानांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या 28 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. आता प्रत्येकाची कोरोना टेस्ट केली जाऊ शकते. देशात कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होत आहे. पोलीस, सुरक्षा दल तसेच तिन्ही दलांवरही कोरोनाचे संकट आहे. यापूर्वी महाराष्ट्रात नौदलाच्या जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. वाचा-कोरोना व्हायरस : पुण्यातील 5 महत्त्वाच्या अपडेट्स एका क्लिकवर नौदलाच्या जवानांनाही कोरोनाची लागण भारतीय नौदलाच्या जवानांनाही कोरोनाची लागण झाली आहे. नुकताच नौदलात 25 हून अधिक जवानांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या, त्यापैकी 21 पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. आयएनएस आंग्रे, मुंबई येथे 21 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. सध्या सैनिकांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत. आयएनएस आंग्रे, मुंबई कॅम्पसमध्ये एका खलाशीपासून दुसऱ्याला कोरोनाची लागण झाली. 7 एप्रिल रोजी केलेल्या तपासणीत या खलाशीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. आयएनएस आंग्रे, मुंबई कॅम्पसमधील सर्वांना क्वारंटाइन केले आहे. तसेच, संक्रमण आणि त्याचा प्रसार रोखण्यासाठी सर्व पावले उचलली गेली आहेत. वाचा-देशात कोरोनाचे रुग्ण किती वाढले, किती लोकांचा झाला मृत्यू, वाचा Latest update याआधी सैन्य दलात घुसला होता कोरोना नुकतीच भारतीय लष्कराचा लेफ्टनंट कर्नल रँक अधिकारी कोव्हिड-19शी दोन हात करण्यासाठी डॉक्टर म्हणून काम करत होते. आता त्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. याआधी लडाखमध्ये एक तरुणाला वडिलांमुळे कोरोना विषाणूची लागण झाली होती. सैन्यात कोरोना विषाणूची ही पहिली घटना होती. सैन्यातली दुसरी घटना दिल्लीहून परत आलेल्या कोलकात्यातील कर्नल रँक डॉक्टरची होती. वाचा-चीनच्या खोटारडेपणामुळं वाढल्या जगाच्या शंका, सर्वात धक्कादायक आकडेवारी आली समोर संपादन, संकलन-प्रियांका गावडे
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या