JOIN US
मराठी बातम्या / देश / FACT CHECK - उकाडा वाढल्यानंतर महाभयंकर कोरोनाव्हायरसचा नाश होणार? काय सांगतात तज्ज्ञ

FACT CHECK - उकाडा वाढल्यानंतर महाभयंकर कोरोनाव्हायरसचा नाश होणार? काय सांगतात तज्ज्ञ

गरमीत (Hot climate) कोरोनाव्हायरस (Coronavirus) टिकणार नाही, असं म्हटलं जातं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 17 :  कोरोनाव्हायरसने (Coronavirus) जगभर थैमान घातलं आहे, प्रत्येक देश कोरोनाव्हायरसवर आळा घालण्याचा प्रयत्न करत आहे. कुणालाही नको असलेल्या उन्हाळ्याची प्रतीक्षा आता प्रत्येक जण करतो आहे, कारण गरमीत (hot climate) महाभयंकर कोरोनाव्हायरस टिकणार नाही, अशी आशा सर्वांना आहे. मात्र खरंच गरमीमध्ये कोरोनाव्हायरसचा नाश होईल का? कोरोनाव्हायरसचा प्रसार झालेल्या देशांचा विचार करता, दक्षिण पूर्व देशांमध्ये कोरोनाव्हायरसची प्रकरणं वाढत आहेत, जिथं दमट आणि गरम हवामान आहे.

हे वाचा -  ‘कोरोना’वर उपचार करणाऱ्या डॉक्टरलाही व्हायरस, आणखी काही डॉक्टरांचा जीव धोक्यात दक्षिण पूर्व देशांमध्ये थंड देशांच्या तुलनेत सुरुवातीला कोरोनाव्हायरसचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे गरम वातावरणात कोरोनाव्हायरस टिकू शकत नाही, असं मानण्यात आलं आणि अमेरिका, युरोपियन देशांमध्येही तापमान वाढल्यानंतर कोरोनाचा कहर कमी होईल, असा विचार केला गेला. मात्र आता दक्षिण पूर्व देशांमध्येही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे तापमानाचा या व्हायरसवर काहीही परिणाम होत नाही, हे दिसून येतं आहे. कोरोनाव्हायरस या गरम आणि थंड कोणत्याही वातावरणात जगू शकतो, असं जागतिक आरोग्य संघटनेनंही (WHO) स्पष्ट केलं आहे.

संबंधित बातम्या

जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनीही सांगितलं की, गरमीत कोरोनाव्हायरसचा नाश होईल, असे काही पुरावे मिळालेले नाहीत. WHO शी संबंधित Global Outbreak Alert चे चेअरपर्सन डेल फिशर यांच्या मते, ‘तापमान वाढल्याने व्हायरस कमी होईल मात्र त्याचा पूर्णपणे नाश होईल, असं वाटत नाही. त्यामुळे वातावरणापेक्षा आयसोलेटवरच जास्त भर द्यावा’ हे वाचा -  कोरोनाव्हायरसचा धोका टाळण्यासाठी होम क्वारंटाइन; जाणून घ्या काय करावं, काय नाही सुरुवातीला कोविड-19 ला फ्लू समजण्यात आलं. मात्र नंतर हा फ्लूपेक्षाही जास्त धोकादायक असल्याचं समजलं, ज्यावर अजूनही उपचार सापडले नाहीत. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ अलर्जी अँड इन्फेक्शन डिसीज चे डायरेक्टर डॉ. अँथेनी फॉसी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की, फ्लू 0.1% लोकांचा जीव घेतो, तिथं कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर 2% आहे. याचा अर्थ हा सामान्य फ्लू नाही. त्यामुळे सामान्य फ्लूप्रमाणे कोविड-19 चाही गरमीत नाश होईल, यावर प्रश्नचिन्हच आहे. कोरोनाव्हायरस अजूनही एक रहस्य आहे. त्यामुळे गरमीची प्रतीक्षा करण्यापेक्षा स्वतला सुरक्षा द्या, असं आवाहन शास्त्रज्ञांनी केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या