किमान 14 दिवस होम क्वारंटाइन म्हणजे इतरांपासून वेगळं राहावं. Ventilated आणि शक्य असल्यास स्वतंत्र शौचालय असेल अशा खोलीत राहावं जर एकाच खोलीत कुटुंबातील इतर सदस्यही राहत असतील तर किमान एक मीटर अंतर ठेवावं. सार्वजनिक कार्यक्रम, समारंभ, बाजारात जाणं टाळावं वयस्कर व्यक्ती, गरोदर महिला, लहान मुलं आणि हायपरटेन्श, डायबेटिज, अस्थमा असलेल्या रुग्णांपासून दूर राहावं. साबण आणि पाण्याने हात सातत्याने स्वच्छ धुवावेत. ग्लास, डिश, टॉवेल, बेडशीट आणि अशा इतर वस्तू इतरांशी शेअर करू नयेत. सर्जिकल मास्क घालावा. हा मास्क दर 6 ते 8 तासांनी बदलावा. तो एका पेपरमध्ये नीट गुंडाळून टाकून द्यावा. डिस्पोजेबल मास्क पुन्हा वापरू नये. खोकला, ताप, श्वास घेताना त्रास अशा काही समस्या असल्यास तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगावं.