मुंबई, 22 ऑगस्ट : देशात आज कोरोनाचा आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत 24 तासांत सर्वात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 70 हजाराच्या आसपास नवीन लोकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या नुकत्याच आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासांत 69 लाख 878 नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या 29 लाख 75 हजार 702वर पोहोचली आहे. 24 तासांत देशात 945 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत कोरोनामुळे 55 हजार 794 रुग्णांनी जीव गमावला आहे. सध्या देशात 6 लाख 97 हजार 330 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.
हे वाचा- उमेदवारासाठी कायपण!कोविड सेंटरमधून PPE कीट घालून मनसेची महिला सदस्य आली मतदानाला दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुळे मृत्यूमुखी होणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणात घट झाली असून आतापर्यंत देशात 22 लाख 22 हजार 578 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा विक्रमी वाढ झाली आहे. राज्यात शुक्रवारी 14 हजार 161 नवे रुग्ण सापडले. दिवसभरात 339 जणांचा मृत्यू झाला. तर 11 हजार 749 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 71.39 टक्के आहे. तर राज्यात 1 लाख 65 हजर 162 Active रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत करोनाबधितांची संख्या 6 लाख 57 हजार 450 एवढी झाली आहे. तर ठाणे महापालिका क्षेत्रात 183 कोरोणा पॉझीटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.