JOIN US
मराठी बातम्या / देश / देशात दर तासाला एक हजार रुग्ण, कोरोनाची आतापर्यंत सर्वात धक्कादायक बातमी

देशात दर तासाला एक हजार रुग्ण, कोरोनाची आतापर्यंत सर्वात धक्कादायक बातमी

देशात कोरोनामुळे 24 तासांत मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 05 जुलै : चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोनानं जगभरात हाहाकार पसरवला आहे. भारतात तर दिवसेंदिवस कोरोनाचं थैमान सुरू आहे. देशात दिवसेंदिवस कोरोनाच्या आकड्यांचे नवीन रेकॉर्ड होत आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे दर तासाला सरासरी एक हजार नवीन रुग्णांची नोंद केली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात 24 तासांमध्ये 24 हजार 850 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर कोरोनामुळे 613 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनामुळे 24 तासांत मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातही दिलासा देणारी बाब म्हणजे भारतात रिकव्हरी रेट चांगल पाहायला मिळत आहे. आतापर्यंत देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 6 लाख 73 हजार 165 वर पोहोचली आहे. त्यापैकी 4 लाख 09 हजार 083 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. भारतात कोरोना संसर्गातून बरे होण्याचा रिकव्हरी रेट 60 टक्क्यांवर पोहोचल्यानं काहीसा दिलासादायक बाब असल्याचं मानलं जात आहे. हे वाचा- ‘हे’ ऐतिहासिक शहर हादरलं; तासाभरात सापडले 5 बेवारस मृतदेह, होणार कोरोना चाचणी

संबंधित बातम्या

हे वाचा- ऑक्टोबरपर्यंत सरकार पाडण्याचे भाजपचे मनसुबे पण.., राऊतांचा राज्यपालांवर निशाणा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या मते, 4 जुलै रोजी, 2, 48, 934 नमुन्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. देशात आतापर्यंत 9789066 लोकांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र, तेलंगणा, दिल्लीमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र आज पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या (Coronavirus Patient ) संख्येने हादरुन गेला आहे. मागच्या 24 तासांत राज्यात 7074 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 200064 वर गेली आहे. शनिवारी 295 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूची एकूण संख्या 8671वर गेली आहे. तर मुंबईत रुग्णांची एकूण संख्या 83237 वर गेली असून फक्त मुंबईत आत्तापर्यंत 4830 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. संकलन, संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या