त्या ठिकाणी जाऊन स्वॅब घेतल्यानंतर फक्त 36 मिनिटांमध्ये त्या टेस्टचा निकाल हाती येणार आहे.
नवी दिल्ली, 26 एप्रिल : कोरोना व्हायरस खरोखर बहुरूपी आहे. शरीराच्या कोणत्याही भागामध्ये लपून बसणे आणि स्वतःची संख्या वाढविणे, त्या व्यक्तीला मृत्यूच्या जवळ घेऊन जाणे, हे कोरोना व्हायरसचे वैशिष्ट्य आहे. हा विषाणू पहिल्यांदा संसर्ग झाल्यावर 21 दिवसांपर्यंत डोळ्यात राहू शकतो. त्यांनतर त्याची लक्षणे प्रथम दिसू लागतात, असं काही वैज्ञानिकांनी स्पष्ट केलं आहे. इटलीमधील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर इन्फेक्टीव्ह डिजीजिसच्या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की डोळे लाल होणे देखील कोरोनाचे लक्षण असू शकते. चीनच्या वुहानहून परतल्यानंतर पाच दिवसांनंतर, 65 वर्षांच्या इटालियन महिलेमध्ये दिसून आलेल्या लक्षणांमुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे. एका दिवसातच त्यांची प्रकृती इतकी खराब झाली की त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्या संसर्गामुळे महिलेचे डोळे लाल झाल्याचे वैज्ञानिकांना आढळले. काही दिवसांनंतर ताप आला आणि डोळे अधिक लाल झाले. तपासणी केलेल्या महिलेचे डोळे लाल होणे हा प्रकार डॉक्टरांनी गंभीरपणे घेतला आणि रोज त्याची तपासणी केली. यावेळी असे लक्षात आले की विषाणू महिलेच्या डोळ्यात लपला होता. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, विषाणू 21 दिवस महिलेच्या डोळ्यात राहिला. विशेष गोष्ट अशी आहे की घश्यातील स्वॅबमध्ये कोणताही विषाणू नव्हता. परंतु पाच दिवसानंतर डोळ्यातील द्रवपदार्थात विषाणू आढळला. त्यामुळे या तथ्यानंतर भारतातील लोकांनी जास्त काळजी घेण्याची आवश्यता आहे. हेही वाचा- देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात, टॉप 5 मध्ये या राज्यांचा समावेश नेत्रतज्ज्ञांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे. नेत्रतज्ज्ञांनी डोळ्यांच्या समस्येने रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांविषयी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जागतिक नेत्रतज्ज्ञांनी केले आहे. रुग्णाच्या डोळ्यांची तपासणी करताना काळजी घ्यावी लागते. डोळ्याच्या पृष्ठभागात विषाणू राहतो त्यानंतर तो पसरतो. व्हायरस डिटेक्टर स्वत: च्या डोळ्यामध्ये प्रती बनवतात, व्हायरस डोळ्याच्या द्रव्यांमध्ये आपल्या प्रती बनवत राहतो. नेल्स ऑफ इंटर्नल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, डोळ्यातील श्लेष्मा आणि अश्रू देखील व्हायरस वाहून नेतात, ज्यामुळे इतरांना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे यापासून स्वतःचा बचाव करण्याची गरज आहे. संपादन - अक्षय शितोळे