JOIN US
मराठी बातम्या / देश / राहुल गांधींच्या राजीनाम्यावर 15 जुलैपूर्वी CWC घेणार हा निर्णय!

राहुल गांधींच्या राजीनाम्यावर 15 जुलैपूर्वी CWC घेणार हा निर्णय!

काँग्रेसचं अध्यक्षपद कुणाकडे जाणार? मोतीलाल व्होरा की सुशीलकुमार शिंदे?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 09 जुलै : लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पण, काँग्रेस वर्किंग कमिटिनं त्यांचा राजीनामा अद्याप देखील स्वीकारलेला नाही. राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली. शिवाय, ट्विटरवर काँग्रेस अध्यक्ष म्हणून असलेल्या उल्लेख देखील काढला. दरम्यान, आता काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांचा राजीनामा स्वीकारण्यावर सहमती झाली असून 15 जुलैपूर्वी काँग्रेस वर्किंग कमिटी त्यावर निर्णय घेणार आहे. यावेळी काँग्रेसला नवा अध्यक्ष देखील मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मोतीलाल व्होरा यांच्याकडे सध्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्यानंतर मोतीलाल व्होरा यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याची चर्चा आहे. शिवाय, सुशीलकुमार शिंदे यांचं नाव देखील आघाडीवर आहे. कर्नाटकातील Congress - JDS सरकारचं भवितव्य विधानसभा अध्यक्षांच्या हातात काँग्रेसचा अध्यक्ष कोण? काँग्रेस अध्यक्षपदासाठी आता सुशीलकुमार यांचं नाव आघाडीवर आहे. सुशीलकुमार शिंदे हे गांधी घराण्याच्या विश्वासातील आणि जवळचे आहेत. शिवाय, राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका या देखील काँग्रेससाठी महत्त्वाच्या आहेत. या निवडणुकीमध्ये दलित मतदारांना काँग्रेसकडे आणण्यासाठी देखील सुशीलकुमार शिंदेंचा मोठा फायदा काँग्रेसला होईल असा तर्क देखील आहे. ऑक्टोबरमध्ये निवडणुका राज्यात ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुका काँग्रेससाठी महत्त्वाच्या आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची पारंपरिक समजली जाणारी दलित मंत ही वंचित बहुजन आघाडीकडे वळली होती. त्यावर देखील आता काँग्रेसनं गांभीर्यानं विचार करायला सुरूवात केली आहे. त्यासाठी सुशीलकुमार शिंदेंच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घालणं काँग्रेसला फायदेशीर ठरणार असल्याचं मत राजकीय निरिक्षकांचं आहे. SPECIAL REPORT: बॉटल कप चॅलेंजचा ‘हा’ नवा ट्रेन्ड तुम्ही पाहिला का?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या