कर्नाटकातील Congress - JDS सरकारचं भवितव्य विधानसभा अध्यक्षांच्या हातात; आज निर्णय!

कर्नाटकातील Congress - JDS सरकारचं भवितव्य विधानसभा अध्यक्षांच्या हातात; आज निर्णय!

Congress - JDS सरकारचं भवितव्य आता विधानसभा अध्यक्षांच्या हाती आहे.

  • Share this:

बंगळूरू, 09 जुलै : कर्नाटकातील राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. 13 आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर कुमारस्वामी सरकारचं भवितव्य अधांतरी आलं. राजीनामा दिल्यानंतर 13 आमदार मुंबईत दाखल झाले. त्यानंतर त्यांना गोवाला हलवण्यात आलं. 13 आमदारांना मंत्रिपद, मतदारसंघासाठी स्पेशल पॅकेज देण्याची कबुली देखील दिली गेली. पण, आमदार मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यानंतर आता कर्नाटकातील राजकीय घडामोडी रंजक झाल्या आहे. काँग्रेस – जेडीएस सरकार जाणार की राहणार? याचा निर्णय आज होणार आहे. विधानसभा अध्यक्ष यावर आता निर्णय घेतील. सोमवारी अपक्ष आमदारानं देखील राजीनामा देत भाजपला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे ऑपरेशन लोटसबद्दल देखील चर्चा सुरू झाल्या. भाजपवर देखील आता सरकार अस्थिर केल्याचा आरोप केला जात आहे.

बहुमताचा दावा

या साऱ्या घडामोडी घडत असताना कुमारस्वामी अमेरिका दौऱ्यावर होते. दरम्यान, 13 आमदारांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस – जेडीएस सरकार अल्पमतात आलं. पण, सत्ताधाऱ्यांनी मात्र हा दावा फेटाळून लावत सरकार बहुमतात असल्याचा दावा केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष येदीयुरप्पा यांनी आता मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा राजीनामा मागितला आहे. त्यावेळी त्यांनी 107 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. काँग्रेस – जेडीएस सरकार पाडून भाजप देखील सरकार स्थापनेचा दावा करू शकतं. 2018मध्ये सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर देखील भाजपला बहुमत सिद्ध करता आलं नव्हतं. त्यामुळे केवळ अडीच दिवसात येदीयुरप्पा सरकार बरखास्त झालं होतं. पण, आताच्या परिस्थितीमध्ये भाजप काय निर्णय घेणार? सत्तेच्या सारीपटावरचे कोणते प्यादे हलवणार? याकडे लक्ष लागून राहिलं आहे.

VIDEO: खासदार इम्तियाज जलील अडचणीत, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

First published: July 9, 2019, 9:27 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading