JOIN US
मराठी बातम्या / देश / काँग्रेससाठी 'भारत जोडो यात्रा' संजीवनी, कर्नाटकात मेहनतीला कसे मिळाले फळ? पक्षाने सांगितलं कारण

काँग्रेससाठी 'भारत जोडो यात्रा' संजीवनी, कर्नाटकात मेहनतीला कसे मिळाले फळ? पक्षाने सांगितलं कारण

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाचे श्रेय काँग्रेसने राहुल गांधींनी काढलेल्या भारत जोडो यात्रेला दिले.

जाहिरात

काँग्रेससाठी 'भारत जोडो यात्रा' संजीवनी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 मे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाचे मोठे श्रेय काँग्रेसने ‘भारत जोडो यात्रे’ला दिले आहे. ‘भारत जोडो यात्रा विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी’ या द्वंद्वात राहुल गांधींनी काढलेली पदयात्रा ‘स्पष्ट विजयी’ ठरल्याचे पक्षाने म्हटले आहे. ‘भारत जोडो यात्रा’ पार पडलेल्या 20 विधानसभा मतदारसंघांपैकी काँग्रेसने 15, तर जनता दल (धर्मनिरपेक्ष) 3 आणि भारतीय जनता पक्षाने 2 जागा जिंकल्या. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत या 20 जागांपैकी काँग्रेसला फक्त 5 जागा मिळाल्या होत्या. कर्नाटकचा विजय काँग्रेसचा आत्मविश्वास वाढवणारा आहे. कारण गेल्या वर्षभरात काँग्रेसनं हे दुसरं राज्य भाजपकडून खालसा केलाय. त्यामुळे 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कर्नाटकचा विजय फायदेशीर ठरणार का हाच खरा प्रश्न आहे. कर्नाटक निवडणुक निकालाचा कल काँग्रेसच्या बाजूनं झुकताचं काँग्रेसनं आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवर राहुल गांधींचा भारत जोडो यात्रेचा व्हिडिओ शेअर केला. कर्नाटकात निवडणूक निकालात काँग्रेसनं सुरुवातीपासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली. काँग्रेस आणि भाजपमधील अंतर सतत वाढत गेलं. त्यामुळे कर्नाटकची सत्ता राखण्याच्या भाजपच्या स्वप्नावर पाणी पडलं. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा फायदा काँग्रेसला झाला आहे. खरंतर या निवडणुकीत खरी लढत भाजप आणि काँग्रेसमध्येच झाली. भाजपनं या प्रचारात मुख्यमंत्री आणि नेत्यांची फौज उतरवली होती. (योगी आदित्यनाथ, फडणवीस) स्वत: पंतप्रधन नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांनी अनेक सभा आणि रोड शो केले. मात्र, त्याचा फारसा प्रवाभ निवडणूक निकालात दिसला नाही. राहुल गांधीची भारत जोडो यात्रा काँग्रेससाठी रामबाण ठरली. आणि काँग्रेस कर्नाटकची सत्ता खेचून आणली. वाचा - ‘ही चांगली गोष्ट आहे की..’ कर्नाटक विधानसभा निकालावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया कर्नाटकचा विजय मरगळलेल्या काँग्रेसला उभारी देणारा आहे. गेल्या वर्षी झालेल्या हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं घवघवीत यश मिळवलं. काँग्रेसने एकूण 68 जागांपैकी 40 जागा जिंकत भाजपाला सत्तेतून बेदखल केलं. आता वर्षभरातचं काँग्रेस कर्नाटक विधानसभेच्या माध्यमातून दुसरा मोठा विजय मिळवत भाजपला दुसरा धक्का दिला आहे. आता काँग्रेसची नजर राजस्थानवर असणार आहे. राजस्थानात काँग्रेसचे अशोक गेहलोत याचं सरकार आहे. त्यामुळे इथली सत्ता राखण्याचं आव्हान राहुल गांधींसमोर असणार आहे. यावर्षच्या अखेरीस राजस्थान विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. आतापासूनचं काँग्रेसनं राजस्थान मॉडेलचा प्रचार सुरु केला आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील राजकीय संघर्ष पेटला आहे. आता कर्नाटकच्या विजयानंतर काँग्रेस हायकमांडकडून या दोन्ही नेत्यांमध्ये मध्यस्थीचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून कन्याकुमारी ते काश्मीर अशी पदयात्रा केली. त्यामुळे राहुल गांधींची जनमाणसातील प्रतिमा बदलण्यास मदत झालीय. निवडणुकीत त्याचा फायदा होताना दिसतोय. राजस्थान, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. आता त्यामध्ये कर्नाटकची भर पडली आहे. पण 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला याचा फायदा होणार का हाच खरा प्रश्न आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या