JOIN US
मराठी बातम्या / देश / India-China Standoff: चीनचा मुजोरपणा सुरूच, सीमेवर पुन्हा सैन्यांची जमवाजमव

India-China Standoff: चीनचा मुजोरपणा सुरूच, सीमेवर पुन्हा सैन्यांची जमवाजमव

India-China Standoff: सीमेवर परिस्थिती चिघळणार नाही यासाठी प्रयत्न होणं गरजेचं होतं. मात्र चीनने तसा प्रयत्न केला नाही.

जाहिरात

त्यामुळे इथे तैनात असलेल्या सैनिकांची कसोटी लागत असते. अशा वातावरणात काम करणं हे सर्वात कठिण काम असतं. त्यामुळे लडाखमध्ये 15 दिवसांत सैनिकांची ड्युटी बदलली जात आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 11 सप्टेंबर: सीमेवर निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी भारत आणि चीनची (India-China Standoff) दोन स्तरावर चर्चा सुरू आहे. राजनैतिक आणि लष्करी अधिकाऱ्यांमध्ये ही चर्चा सुरू आहे. मात्र सीमेवर चिनी सैन्याचा मुजोरपणा सुरूच असून आता फिंगर- 3 भागात चिनी सैन्याने जमवाजमव केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे तणाव कमी व्हावा असं चीनलाच वाटत नसल्याचं स्पष्ट होतेय असं तज्ज्ञांचं मत आहे. रशियाची राजधानी मॉस्को इथं झालेल्या शांघाय सहकार्य परिषदेच्या निमित्ताने संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि परराष्ट्रमंत्री जयशंकर हे त्यांच्या समकक्ष चिनी मंत्र्यांना भेटले. सीमेवरच्या तणावानंतर सर्वोच्च पातळीवर झालेल्या या चर्चा होत्या. सीमेवर तणाव वाढू नये, शांतता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. त्यानंतर सीमेवर परिस्थिती चिघळणार नाही यासाठी प्रयत्न होणं गरजेचं होतं. मात्र चीनने तसा प्रयत्न केला नाही. फिंगर-4 जवळच्या उंचावरच्या जागा भारतीय सैन्याने ताब्यात घेतल्यावर चिनी सैन्याने ही जमवाजमव केली केल्याचं बोललं जात आहे. ‘…तर चीनची गय करणार नाही’, चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना एस. जयशंकर यांचा इशार परराष्ट्र मंत्रालयाने या दोन्ही नेत्यांच्या बैठकीनंतर एक निवेदन जारी केलं आणि त्यात म्हटलं आहे की, हा 5 मुद्यांवर सहमती झाली आहे.  यामध्ये दोन्ही देशांमधील संबंधात कोणत्याही मतभेदांमुळे वाद होऊ नये असं परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी (Wang Yi) यांनी कबूल केलं असल्याचं सांगण्यात येत आहे. इतकंच नाही तर मॉस्को इथे झालेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी सीमेवर शांतता आणि सद्भाव कायम ठेवण्यावर सहमती दर्शवली आहे. सोबतच  दोन्ही देश वाटाघाटीद्वारे सीमा विवाद सोडवणार यावरही सहमती दर्शवण्यात आली आहे. एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर चर्चा सुरूच राहिल , असंही दोन्ही देशांनी ठरवलं असल्याची माहिती समोर येत आहे. लढाऊ विमान राफेल IAF मध्ये झालं सामील; वॉटर सॅल्यूट देत केला सन्मान, पाहा PHOTOS भारत आणि चीनच्या मॉस्को इथं बैठकीनंतर चिनी परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की, अतिशय महत्त्वाच्या अशा चर्चेनंतर दोन्ही बाजूंच्या सद्यस्थितीबद्दल 5 कलमांवर एकमत झालं आहे. ‘हे दोन शेजारी देश असल्याने चीन आणि भारत यांच्यात काही विषयांवर मतभेद असणं स्वाभाविक आहे. असं चिनी परराष्ट्र मंत्रालयाकडून म्हटलं गेलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या