'...तर चीनची गय करणार नाही', चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना एस. जयशंकर यांचा इशारा

'...तर चीनची गय करणार नाही', चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना एस. जयशंकर यांचा इशारा

LACवर तणाव असला तरीही भारताकडून सर्व सीमा संबंधित करारांचं कटेकोरपणे पालन केलं जात आहे- एस जयशंकर

  • Share this:

मॉस्को, 11 सप्टेंबर : चीनकडून लडाखमध्ये सातत्यानं सुरू असलेल्या कुरापतींमुळे भारत-चीन लडाखमधील सीमेवर तणावाचं वातावरण आहे. मे पासून तीनवेळा आतापर्यंत दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झटापट आणि गोळीबार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. शांतता प्रस्थापित करण्याबाबत अनेकदा चर्चा केली असूनही चीनकडून मात्र नियमांचं उल्लंघन केलं जात आहे.

या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पार पडली. तब्बल अडीच तासांच्या या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा देखील झाली आहे. यामध्ये 5 मुद्द्यांवर अखेर सहमती झाली आणि शांतता प्रस्थापित करण्याबाबत एकमत झाले. जयशंकर यांनी वांग यी यांना स्पष्टपणे सांगितले की सर्व सीमा-संबंधीच्या कराराचे पूर्ण पालन केले पाहिजे.

हे वाचा-India-China Faceoff: LACवर तणाव कमी करण्यासाठी भारत-चीनमध्ये 5 मुद्द्यांवर सहमती

भारतीय जवानांनी LACवर तणाव असतानाही सीमा संबंधित सर्व कराराचे पालन केलं मात्र चीननं अधिक सैन्य आणि अत्याधुनिक उपकरणांचा सपाटा भारताच्या दिशेनं वाढवण्यास सुरुवात केली आहे. याबाबत चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आले. चीन 1993 आणि 1996 रोजी करण्यात आलेल्या करारचं उल्लंघन करत आहे. चीनकडून वारंवार कुरापती सुरू आहे. भारतानं मांडलेल्या आक्षेपावर मात्र चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं मौन बाळगलं होतं.

चीनकडून कुरापती वारंवार होत असतील तर भारतीय सैन्य प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहे मात्र सीमेवर शांतता प्रस्थापित राहाणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचंही एस जयशंकर यांनी या बैठकीत नमूद केलं आहे. LACवर तणाव असला तरीही भारताकडून सर्व सीमा संबंधित करारांचं कटेकोरपणे पालन केलं जात असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 11, 2020, 8:55 AM IST

ताज्या बातम्या