JOIN US
मराठी बातम्या / देश / दहावीच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, कारण ऐकून धक्का बसेल

दहावीच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, कारण ऐकून धक्का बसेल

मध्यप्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली असून येथे दहावीच्या विद्यार्थाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

जाहिरात

दहावीच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, कारण ऐकून धक्का बसेल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

छत्तरपूर, 11 जुलै : सध्या कमी वयात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. अशातच मध्यप्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली असून येथे दहावीच्या विद्यार्थाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सोमवारी शाळेत प्रार्थना सुरु असताना रांगेत उभा असलेला 17 वर्षीय विद्यार्थी अचानक कोसळला. यावेळी शाळेच्या कर्मचाऱ्यांनी त्याला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा जीव वाचू शकला नाही. या घटनेनं त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. सार्थक टिकरिया असं मृत मुलाचं नाव असून तो रसिद्ध उद्योगपती आलोक टिकरिया यांचा मुलगा होता. तो छत्तरपूर येथील महर्षी विद्या मंदिर शाळेत शिकत होता. कुटुंबाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सार्थक नेहमीच्या दिनक्रमानुसार सकाळी 6 वाजता उठला आणि तयार होऊन शाळेत जाण्यासाठी निघाला. शाळेत 7.30 ते 8.00 च्या सुमारास शाळेतील मुले ही प्रार्थना म्हणण्यासाठी रांगेत उभी होती. यावेळी अचानक सार्थक जमिनीवर पडला. यावेळी शाळेच्या कर्मचाऱ्यांनी मुलाला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला आणि कुटुंबीयांना कळवले. सार्थकला तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. एकापेक्षा जास्त व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवणं योग्य की अयोग्य? पाहा सदगुरू काय म्हणतात कुटुंबीयांनी घेतला नेत्रदान करण्याचा निर्णय : 17 वर्षांचा मुलगा गमावल्याने सार्थकच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. परंतु त्याचे वडील आलोक यांनी आपल्या मुलाच्या आठवणी जतन करण्यासाठी सार्थकचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला. माझ्या मुलाच्या डोळ्यांतून कोण तरी दुसरं हे जग पाहू शकत अशा भावना वडिलांनी व्यक्त केल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या