वर्क फ्रॉम होम लोअर परळ
नवी दिल्ली, 14 मे : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. यादरम्यान जीवन फार बदललं आहे. अगदी कामाच्या पद्धतीतही मोठा बदल झाला आहे. गेल्या दीड महिन्यांहून जास्त कालावधीपासून लाखो कर्मचारी वर्क फ्रॉम होम करीत आहेत. खासगी कार्यालयांसह आता भारत सरकारचेही अनेक मंत्रालयांचे कामकाज वर्क फ्रॉम होमअंतर्गत सुरू आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून नवी गाइडलाइन्स जारी करण्यात आली आहे. या गाइडलाइन्सचे पालन करीत कर्मचाऱ्यांना घरातून काम करावे लागणार आहे. सरकारद्वारे जारी केलेल्या गाइडलाइन्समध्ये सांगण्यात आले आहे की, सरकारचे सर्व 75 मंत्रालये ई-ऑफिसच्या माध्यमातून सुरू आहेत. सध्या मंत्रालयाचे तब्बल 80 टक्के काम या माध्यमातून केले जात आहे. त्यामुळे ई-ऑफिसच्या माध्यमातून सर्व फाईल्स पाठवाव्या लागतील. मात्र या विभागाचे काम संवदेवशील असते. त्यामुळे या फाईल्स लिक होण्याची भीती असते. त्यामुळे वीपीएन आणि सुरक्षित नेटवर्कची व्यवस्था करण्यात येणार आहे. ही व्यवस्था डिप्टी सेक्रेटरीपर्यंतच्या अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. दरम्यान लोकांना लॉकडाऊनमधून सावरण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग दुसऱ्या दिवशी आर्थिक पॅकेजसंदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्यामध्ये शेतकरी आणि मजुरांबरोबर छोट्या दुकानदारांसाठी भरीव मदत जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटी रुपयांचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी (MSMEs) योजना सादर केल्या होत्या. आता शेतकरी आणि छोट्या दुकानदारांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. संबंधित - धक्कादायक! कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या भाजप युवा मोर्चा नेत्याचा मृत्यू VIDEO : पोटाची खळगी भरण्यासाठी मजूर भिडले, प्लॅटफॉर्मवर बिस्कीटांसाठी तुफान राडा