बलरामपूर, 06 एप्रिल : देशभरात कोरोना व्हायरसचं थैमान सुरू असताना हा प्रादूर्भाव रोखण्यासाठी नागरिक आणि प्रशासनाकडून वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. तर कोरोनाविरोधात लढण्यासाठी रविवारी 9 वाजून 9 मिनिटांला दिवा पेटवून देशातील जनतेने राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला आहे. दिव्यांच्या प्रकाशात यावेळी संपूर्ण आसमंत उजळून निघाला होता. मात्र दुसरीकडे बलरामपूर इथे कोरोनाला पळवून लावण्यासाठी भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षांनी थेट हवेत गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा मंजू तिवारी यांनी कोरोनाला पळवण्याासाठी रिवॉल्वरमधून हवेत गोळीबार केला आहे. त्यांनी हा गोळीबार करण्याचा व्हिडीओ फेसबुकवर अपलोड केला आहे.
हे वाचा- समाजकंटकांचा डाव उधळून लावणार, तबलिगी जमातल्या नेत्यांशी राजेश टोपेंची चर्चा
पंतप्रधान मोदींनी दीप प्रज्वलनाचं आवाहन केलं होतं. दिवे लावून झाल्यानंतर मंजू तिवारी यांनी कोरोनाला पऴवण्यासाठी हवेत गोळीबार करत आहेत. आपण या व्हिडीओमध्ये पाहून शकता हातात रिवॉल्वर घेऊन कशा पद्धतीनं त्यांनी गोळीबार केला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बलरामपूर इथे घडली आहे. त्यांच्या या व्हिडीओला 224 लाईक्स आणि 66 कमेंट्स आल्या आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अशा पद्धतीनं हवेत गोळीबार केल्याप्रकरणी त्यांच्यावर पक्ष आणि पोलीस कारवाई करणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. हे वाचा- नरेंद्र मोदींनी दिवे लावायला सांगितले, अतिउत्साही लोकांनी चक्क विहिरच पेटवली