JOIN US
मराठी बातम्या / देश / फक्त 5 सेकंदात पूल कोसळला नदीत, 1700 कोटी पाण्यात; थरारक VIDEO VIRAL

फक्त 5 सेकंदात पूल कोसळला नदीत, 1700 कोटी पाण्यात; थरारक VIDEO VIRAL

दोन वर्षांपुर्वीही या पुलाचा काही भाग नदीत कोसळला होता, तर एप्रिल महिन्यात वादळामुळे एका भागाला नुकसान पोहोचले होते.

जाहिरात

बिहारमध्ये ब्रीज नदीत कोसळला

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पाटणा, 04 जून : बिहारच्या भागलपूरमध्ये बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितीहानी झालेली नाही. पूल कोसळत असलेला व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. काही जिवितहानी झाली नसली तरी पूल पडल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. भागलपूर-सुलतानगंजमध्ये बांधकाम सुरू असलेला पूल कोसळल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. अवघ्या काही सेकंदात पूल गंगा नदीत कोसळल्याचं यामध्ये दिसतं. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या पुलाचे बांधकाम सुरू आहे. दोन वर्षांपूर्वीही या पुलाचा एक भाग कोसळला होता.

संबंधित बातम्या

गंगा नदीवर असलेला हा पूल 1717 कोटी रुपये खर्च करून बांधला जात असल्याचं सांगण्यात येत आहे. वादळामुळे या पुलाच्या काही भागाचे एप्रिल महिन्यातही नुकसान झाले होते. भागलपुरच्या अगुवानी घाट ते सुल्तानगंज यांच्या दरम्यान या पुलाचे बांधकाम सुरू आहे. आता या पुलाचा मोठा भाग गंगा नदीत बुडाला. बांधकाम सुरु असलेल्या या पुलाचे सुपर स्ट्रक्चरच पाण्यात कोसळलं आहे. पुलाचा पाया नंबर 10, 11, 12 यावर उभा असलेलं सुपर स्ट्रक्चर कोसळलं. याचा भाग जवळपास १०० मीटरचा आहे. पुलाचे स्ट्रक्चर कशामुळे कोसळलं हे अद्याप समोर आलेलं नाही. भागलपूर पुलाचे बांधकाम एसपी सिंगला कंपनीकडून केलं जात आहे. यामुळे खगडिया आणि भागलपूर हे दोन जिल्हे जोडले जाणार आहेत. बिहारमधला महत्त्वकांक्षी असा प्रकल्प असून त्याला पूर्ण होण्यास बराच काळ लागला आहे. पुलाचे काम ८० टक्के पूर्ण झालं होतं. तर अप्रोच रोडचं कामही ५४ टक्के पूर्ण झालं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या