JOIN US
मराठी बातम्या / देश / मोठी बातमी! बंड शमलं; सचिन पायलट यांच्या घरवापसीचा प्रस्ताव निश्चित

मोठी बातमी! बंड शमलं; सचिन पायलट यांच्या घरवापसीचा प्रस्ताव निश्चित

सचिन पायलट पुन्हा काँग्रेसच्या दिशेने पाऊल टाकत असल्याने भाजपच्या मनसुब्यांना मोठा धक्का बसला आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जयपूर, 10 ऑगस्ट : राजस्थानात सचिन पायलट यांनी बंडखोरी करीत काँग्रेसमधून बाहेर पडले असले तरी त्यांच्या काँग्रेस घरवापसीला हिरवा कंदील मिळाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या घरवापसीचा प्रस्ताव निश्चित करण्यात आला आहे. आज काँग्रेस नेते आणि प्रियांका गांधी यांनी सचिन पायलट यांची भेट घेतली होती. या चर्चेचा सकारात्मक निकाल येण्याचे संकेत वर्तविण्यात आले होते. त्यातचं मोठी बातमी हाती लागली आहे. सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थकांच्या काँग्रेस प्रवेशाचा प्रस्ताव निश्चित करण्यात आला आहे. सूत्रांकडून याबाबत माहिती मिळाली आहे. हे वाचा- माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण अशोक गेहलोत आणि सचिन पायलटमध्ये अंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांच्यासह तब्बल 22 आमदार होते. राज्य सरकारने त्यांच्यावर सरकार पाडण्याचा आरोप लावला होता. शिवाय राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. ज्यामुळे सचिन पायलट नाराज होते. त्यांच्या बंडखोरीनंतर सचिन यांना उपमुख्यमंत्री-प्रदेश अध्यक्ष पदावरुन हटविण्यात आले होते. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आरोप लावला होता की सचिन पायलट भारतीय जनता पक्षासोबत मिळून सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत होते. यासह अनेक महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा झाली. सचिन पायलट पुन्हा पक्षात जाण्याला हिरवा कंदील मिळाला असून  येत्या काळात खरच पायलट काँग्रेसमध्ये पुन्हा जागा बनवू शकतात का हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या