JOIN US
मराठी बातम्या / देश / मोदी सरकारचा मोठा निर्णय, 50 कोटी जनतेची Covid -19 चाचणी होणार मोफत

मोदी सरकारचा मोठा निर्णय, 50 कोटी जनतेची Covid -19 चाचणी होणार मोफत

सध्या देशभरात तब्बल 2900 जणांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत 65 जणांना जीव गमवावा लागला आहे

जाहिरात

**EDS: VIDEO GRAB** New Delhi: Prime Minister Narendra Modi gestures during his address to the nation on coronavirus pandemic in New Delhi, Thursday, March 19, 2020. (PTI Photo)(PTI19-03-2020_000207B)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 4 एप्रिल : देशभरात कोरोनाचा (Coronavirus) फैलाव वाढत आहे. आतापर्यंत 2900 कोरोनाबाधित (Covid -19) रुग्णांची नोंद करण्यात आली असल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मोठा निर्णय़ घेतला आहे. हा निर्णय नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आज केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. मोदी सरकारने कोरोनाची चाचणी आणि त्यावरील उपचार हे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशभरातील तब्बल 50 कोटी जनतेची चाचणी किंवा उपचार हे मोफत होऊ शकणार आहे. नॅशनल हेल्थ अथॉरिटी म्हणजेच NHA यांनी यासंदर्भात माहिती दिली. सध्या देशभरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. देशात 15 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. संबंधित -  धारावीतील बालिका नगर कोरोनाचा हॉटस्पॉट! नवीन 2 रुग्णांची नोंद, एकूण संख्या 4 वर देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा 2900 वर पोहोचला असून 65 जणांना जीव गमवावा लागला आहे. अनेक केसेसमध्ये कोरोनाची लक्षणेही आढळून आलेली नाहीत. त्यामुळे नागरिकांची कोविड – 19 चाचणी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेणाऱ्यांना मोफत कोविड – 19 ची चाचणी करण्यात येणार आहे. संबंधित -  कोरोना रुग्णांवर उपचारासाठी 8 महिन्यांच्या गर्भवती परिचारिकेचा 250 किमीचा प्रवास

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या