JOIN US
मराठी बातम्या / देश / VIDEO : Unlock 1 मध्ये मोठी कारवाई, , 8.5 कोटींच्या दारूवर फिरवला बुलडोजर

VIDEO : Unlock 1 मध्ये मोठी कारवाई, , 8.5 कोटींच्या दारूवर फिरवला बुलडोजर

गुजरातच्या अरवल्ली इथे पोलिसांनी तब्बल 8.5 कोटी रुपयांच्या दारूवर बुलडोजर फिरवला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदाबाद, 10 जून : अनलॉक 1 च्या पहिल्या टप्प्यात गुजरातमध्ये मद्य तस्करीविरोधात पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. गुजरातच्या अरवल्ली इथे पोलिसांनी तब्बल 8.5 कोटी रुपयांच्या दारूवर बुलडोजर फिरवला आहे. या कारवाईदरम्यानचे व्हिडीओ समोर आले आहेत. देशात कोरोना व्हायरसमुळे मार्च महिन्यापासून 31 मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं होतं. त्याच दरम्यान अनेक भागांमध्ये दारूची दुकानंही बंद होती. अनेक दिवसांपासून दारूची तस्करी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकानं कारवाई करून दारू पकडली आहे. तस्करी होत असलेल्या दारूवर पोलिसांनी बुलडोजर फिरवला असून नष्ट करण्यात आली आहे.

हे वाचा- धक्कादायक! कोरोनानं घेतला देशात पहिला आमदाराचा बळी, वाढदिवशीच झाला मृत्यू अरवल्ली इथे 2938 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी सध्या 4 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 114 जण बरे झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 1697 जणांना क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या 19,592 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 13,316 रुग्णांनी कोरोनाविरुद्ध यशस्वी लढा दिला असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 1,219 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हे वाचा- झुंज अखेर अपयशी, कोरोनामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद केणी यांचं निधन संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या