JOIN US
मराठी बातम्या / देश / रुग्णालयात नाही तर आईकडे जायचं म्हणत तिला गाडीत बसवलं, नर्ससह तिच्या मुलीलासुद्धा कोरोना

रुग्णालयात नाही तर आईकडे जायचं म्हणत तिला गाडीत बसवलं, नर्ससह तिच्या मुलीलासुद्धा कोरोना

मुलीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला न्यायला अॅम्ब्युलन्स आली तेव्हा ती रडत होती. दोघींवर एकाच रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ, 12 मे : कोरोनाच्या संकटात सध्या आरोग्य कर्मचाऱी रुग्णांची सेवा करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. त्यांच्या अडचणी, कुटुंबिय या सर्वांना बाजूला ठेवून स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. कोरोनामुळे अनेक आरोग्य कर्मचारी घरी जाऊ शकलेले नाहीत. यातील काहींना लहान मुलंही आहेत त्यांची भेट घेता आलेली नाही. हमीदिया रुग्णालयात काम करणाऱ्या नर्स भावना यांनाही रुग्णांची सेवा करता करता कोरोनाची लागण झाली आहे. तरीही आपण पुन्हा स्वस्थ होऊन कामावर रुजू होऊ आणि देशसेवा करण्याची त्यांची इच्छा आहे. हमीदिया रुग्णालयातील अनेक नर्स, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे जवळपास 150 जण क्वारंटाइन करण्यात आले आहेत. दररोज संसर्ग झालेल रुग्ण आढळून येत आहेत. यातच भावना नावाच्या नर्सलासुद्धा रुग्णांची देखभाल करताना कोरोनाची लागण झाली आहे. भावना यांना कोरोना झाल्याचं निदान उशिराने झालं. यामुळे त्यांची मुलगी निष्ठा हिलासुद्धा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. भावना यांचे सॅम्पल 4 मे रोजी केल्यानंतर 7 मे रोजी रिपोर्ट आले होते. त्यानंतर भावना यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अवस्थेतही त्यांनी आपण ठीक झाल्यानंतर पुन्हा कोरोनाच्या लढ्यात सहभागी होणार असल्याचं म्हटलं आहे. हे वाचा : अरे देवा! कोरोनानंतर आता आणखी एक संकट, उंदरांमार्फत माणसांमध्ये पसरतोय व्हायरस कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर भावना यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे सुद्धा सॅम्पल घेण्यात आले. यात त्यांच्या लहान मुलीला कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. मुलीला नेण्यासाठी अॅम्ब्युलन्स आली तेव्हा ती घाबरली होती. रडत असलेल्या निष्ठाला तिच्या आईकडे जात असल्याचं सांगण्यात आलं. रुग्णालयातही तिला आई सोबतच ठेवण्यात आलं असून दोघींवर एकत्र उपचार सुरू आहेत. हे वाचा : धक्कादायक! स्मशानभूमीत तब्बल 24 तास कोरोना रुग्णाचा मृतदेह अंत्यसंस्काराविना

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या