Home /News /national /

धक्कादायक! स्मशानभूमीत तब्बल 24 तास कोरोना रुग्णाचा मृतदेह अंत्यसंस्काराविना

धक्कादायक! स्मशानभूमीत तब्बल 24 तास कोरोना रुग्णाचा मृतदेह अंत्यसंस्काराविना

स्मशानभूमीत तब्बल 24 तास कोरोना रुग्णाचा मृतदेह अत्यंसंस्काराशिवाय पडून होता.

    मेरठ, 12 मे : देशभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढत आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना मृतांची संख्याही तणाव वाढवणारी आहे. देशातील संपूर्ण यंत्रणा कोरोनाला हरविण्यासाठी काम करीत आहे. अशा परिस्थितीत एक मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. मेरठ येथील सुरजकुंड स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तब्बल 24 तासांची प्रतीक्षा करावी लागली. हा मृतदेह कोरोनाचा संसर्ग झालेल्या एका वृद्धाचा होता. स्मशानभूमीतून मृतदेह आणण्यासाठी विविध अधिकाऱ्यांकडून मदत मागितली. मात्र तरीही 24 तासांपर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांची टीम येथे पोहोचू शकली नाही. यानंतर जेव्हा मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला, तेव्हा प्रशासन मदतीसाठी आली आणि मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. कोरोनाव्हायरस प्रोटोकॉलनुसार मेडिकल टीम आल्याशिवाय कोरोनाग्रस्त रुग्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करता येऊ शकत नाही. प्रोटोकॉलनुसार मेडिकल टीम रुग्णवाहिकेने मृतदेह सरणापर्यंत घेऊन जाते. यादरम्यान सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करावे लागते. मात्र ही टीम बराच वेळ पोहोचली नाही. या स्मशानभूमीपासून आरोग्य विभागात अंतर अवघे 4 किलोमीटर आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आरोग्य प्रशासनाची टीम उपस्थित राहिली. कोरोनाचा धोका असताना अशा पद्धतीने कोरोना रुग्णाचा मृतदेह बराच काळ ठेवणे योग्य नसल्याचे सांगितले जात आहे. तब्बल 24 तास कुटुंबीयही स्मशानभूमीत थांबून राहिले होते. दुपारीच हे कुटुंब स्मशानभूमीत दाखल झालं होतं. आधीच नातेवाईक गेल्याचं दु:ख त्यात कोरोनाची भीती यामुळे कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली होती. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाला जाग आली व त्यांनी आरोग्य टीम स्मशानभूमीत पाठवली. संबंधित -Covid-19 : मंत्री शिंकल्याने अख्ख्या राज्यात घबराट, जनतेकडून केली जातेय विचारपूस
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या