हरियाणा, 22 जून : हरियाणाच्या भवानी रेल्वे स्थानकावर माणुसकीला लाज वाटेल अशी एक घटना घडली आहे. रेल्वेमध्ये चढताना एका व्यक्तीचा तोल गेला आणि तो फलाटामध्ये अडकला. या अपघातात दुर्देवाने त्याचा पाय कापला गेला. पण या सगळ्यावर खचून न जाता त्याने हिमतीने त्याचा कापला गेलेला पाय स्वत:च्या हाताने उचलून तो प्लॅटफॉर्मवर चढला. आश्चर्य वाटेल पण तिथे असलेल्या एकाही प्रवाशाने त्याला मदत केली नाही. उलट त्याचा व्हिडिओ काढत बसले. खरंतर ही घटना 17 जूनची आहे. पण या घटनेचा व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला. बरं इतकंच नाही तर रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील त्या व्यक्तीस मदत केली नाही. त्यामुळे आपल्याला आता किती माणुसकी उरली आहे, हे या सगळ्या प्रकरणावरून दिसून येतं.
जीआरपी भिवानी पोलीस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार, 17 जूनला कृष्ण कुमार त्यांच्या पत्नीसह एका आजारी नातेवाईकाला भेटण्यासाठी जात होते. रेल्वे स्थानकावर ते आपल्या पत्नीसाठी पाणी आणायला गेले आणि तितक्यात ट्रेन आली. त्यामुळे त्यांनी घाईत ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा फलाटात पाय अडकला आणि त्यात त्यांनी त्यांच्या पायच गमावला. या अपघातात इतरांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे त्यांनी स्वत:च त्यांचा तुटलेला पाय घेऊन रुग्णालयात गेले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पण दरम्यान, हाच माणुसकी धर्म का असा प्रश्न उपस्थित राहतो.
दुधी भोपळा जीवावर बेतला, रस प्यायल्यामुळे महिलेचा मृत्यू