अंधश्रद्धेचा बळी!, अमर होण्यासाठी पोटच्या गोळ्यासह 'त्या'ने पाच जणांना संपवलं

अंधश्रद्धेचा बळी!, अमर होण्यासाठी पोटच्या गोळ्यासह 'त्या'ने पाच जणांना संपवलं

घरात जादुटोण्याचे साहित्य, मिरची, लिंबू, हळद, कुंकू, बाहुली आणि कापलेले केस आढळले आहे असं सह पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी सांगितलं.

  • Share this:

नागपूर, 19 जून : बहीण आणि स्वता:च्या मुलासह पाच जणांची हत्या करणाऱ्या विवेक पालटकर याने हे हत्याकांड जादुटोण्यातून केल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. आता या प्रकरणात आरोपी पालटकर सह त्याला हे कृत्य करण्यासाठी सल्ला देणाऱ्या तांत्रिक मांत्रिकाचाही पोलिस शोध घेताहेत. धक्कादायक म्हणजे अंधश्रद्धेतून अशा प्रकारे हत्याकांडाचे राज्याच्या उपराजधानीतील हे दुसरे प्रकरण आहे.

नागपुरच्या आराधना नगरात काळजाचा थरकाप उडवणाऱ्या पालटकर कुटुंबाच्या हत्याकांडाचा अखेर उलगडा झालाय. गेल्या आठवड्यात पाच जणांच्या हत्येनं नागपुर हादरलं होतं. या प्रकरणातील फरार आरोपी विवेक पालटकरनं आपली बहिण अर्चनासह तिची मुलगी वेदांती, पती कमलाकर, सासू मीराबाई यांची निर्घृण हत्या केली. एवढंच नाही तर विवेकनं आपल्या पोटच्या मुलालाही संपवलं. कारण त्याला हवं होतं गुप्तधन, अमरत्व आणि चिरतारुण्य...

आरोपीच्या शोधासाठी पथके पाठवली आहे पण भौतिक पुरावे आणि तपासकर्त्यांच्या माहितीनुसार अंधश्रद्देतून हे हत्याकांड झाल्याचा अंदाज आहे. घरात जादुटोण्याचे साहित्य, मिरची, लिंबू, हळद, कुंकू, बाहुली आणि कापलेले केस आढळले आहे असं सह पोलीस आयुक्त  शिवाजी बोडखे यांनी सांगितलं.

दरम्यान, विवेकला हत्येचा सल्ला देणाऱ्या तांत्रिकाचाही शोध पोलीस घेताहेत.

2015 मध्ये महाराष्ट्र मंजुर झालेल्या अंधश्रद्धा विरोधी कायद्यान्वये या प्रकरणात गुन्हा दाखल करू आरोपीला उद्दयुक्त करणाऱ्या बाबा तांत्रिक मांत्रिकालाही आम्ही ताब्यात घेऊन कारवाई करू असं शिवाजी बोडखे यांनी सांगितलं.

आता या प्रकरणात पोलिसांनी गांभीर्यानं तपास करण्याची मागणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केली आहे.

दरम्यान, 18 फेब्रुवारीला नागपुरात उषा कांबळे आणि त्यांची अडीच वर्षाच्या नातीणीचीही त्यांच्या शेजारी राहणाऱ्या गणेश शाहुनं अंधश्रद्धेतूनच गळा कापून हत्या केल्याचं तपासात उघड झालंय.

अंधश्रद्धा विरोधी कायदा मंजुर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असले तरी राज्याच्या उपराजधानीत गेल्या सहा महिन्यात दोन घटनामध्ये नरबळी साठी सात निष्पापांचे बळी गेलेत. आणखी किती बळी गेल्यावर अंधश्रद्धेतून लोकांची माथी भडकविणाऱ्यांवर कारवाई होणार हा प्रश्न नागरिक सरकारला विचारताहेत.

First published: June 19, 2018, 10:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading