मुंबई, 21 जून : कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघाताच्या घटना वारंवार घडतात. अशाच एका तरुणीकडून कारमधील ब्रेकऐवजी एक्सलेटरवर पाय पडल्यामुळे भीषण अपघात घडला. धारावीमध्ये वांद्रयाच्या दिशेनं जाताना ध्रुवी जैन या तरुणीचं कारवरील नियंत्रण सुटलं. यानंतर त्या कारनं रिक्षा आणि ३ दुचाकींसह ५ पादचाऱ्यांना धडक दिली. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला. ध्रुवी जैन ही वांद्रयाच्या दिशेने धारावी मार्गे जात होत्या. या अपघातात वांद्र्यातील पाच जण गंभीर जखमी झालेत. धारावी पोलिसांनी कारचालक ध्रुवी जैनला अटक केली होती. यानंतर तिची जामिनावर मुक्तता करण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.