JOIN US
मराठी बातम्या / देश / फाशीच्या शिक्षेपूर्वी अर्धांगिनीनेही सोडली साथ, निर्भया प्रकरणातील दोषीच्या पत्नीने मागितला घटस्फोट

फाशीच्या शिक्षेपूर्वी अर्धांगिनीनेही सोडली साथ, निर्भया प्रकरणातील दोषीच्या पत्नीने मागितला घटस्फोट

‘मला या दोषीची विधवा म्हणून जगायचं नाही’, असं तिने याचिकेत म्हटलं आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद (बिहार), 17 मार्च : देशाच्या बहुचर्चित निर्भया सामूहिक बलात्कारातील (Nirbhaya Gang Rape Case) दोषी  नवीनगर येथील लहंग कर्मा गावच्या अक्षयच्या (Akshay Thakur) आयुष्यातील अडचणी वाढल्या आहेत. काही दिवसांतच त्याला निर्भया प्रकरणात फाशीची शिक्षा होणार आहे. त्याआधी अक्षयच्या पत्नीने घटस्फोटाची (Divorce) मागणी केली आहे. अक्षय ठाकूरची पत्नी पुनीता यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. पुनिता यांनी औरंगाबाद फॅमिली कोर्टाचे मुख्य न्यायाधीश रामलाल शर्मा यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. अक्षयच्या पत्नीने आपल्या अर्जात असे म्हटले आहे की, ‘माझ्या पतीला बलात्कार प्रकरणात दोषी ठरविण्यात आले आहे आणि त्याला फाशी देण्यात येणार आहे. मात्र मला त्याची विधवा व्हायची इच्छा नाही. त्यामुळे मला घटस्फोट हवा आहे.’ मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात 19 मार्च रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. संबंधित -   निर्भयाच्या दोषींनी आंतरराष्ट्रीय कोर्टाचं दार ठोठावलं, बचावासाठी नवी क्लृप्ती अक्षय ठाकूर यांच्या पत्नीचे वकील मुकेश कुमार सिंह (Mukesh Kumar Singh) म्हणाले की, पीडित महिलेला हिंदू विवाह कायदा 1 (2) (II) अंतर्गत काही प्रकरणांमध्ये घटस्फोटाचा अधिकार मिळण्याचा कायदेशीर अधिकार आहे. यामध्ये बलात्काराचे प्रकरणही समोर आले आहे. एखाद्या महिलेचा पती बलात्काराच्या प्रकरणात दोषी आढळल्यास ती घटस्फोटासाठी अर्ज दाखल करू शकते. 20 मार्च रोजी फाशी निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात ज्या चार दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे, त्यात बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील नवीननगर ब्लॉकच्या लेहंग-कर्मा गावचा अक्षय ठाकूर याचा समावेश आहे. महत्त्वपूर्ण म्हणजे विनय शर्मा (Vinay Sharma), अक्षयसिंग ठाकूर (Akshay Singh Thakur), पवन गुप्ता(Pawan Gupta) आणि मुकेश (Mukesh) या सर्व दोषींना 20 मार्च रोजी पहाटे 5:30 वाजता फाशी देण्यात येणार आहे. त्यापूर्वीच निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाला नवीन वळण लागले आहे. फाशीची शिक्षा पुढे ढकलण्यासाठी दोषींच्या वकिलाने आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दार ठोठावले आहे. या प्रकरणावर आंतरराष्ट्रीय कोर्टात सुनावणी व्हावी यासाठी दोषीच्या वकिलाकडून प्रयत्न केला जात आहे. संबंधित -  निर्भयाच्या गुन्हेगारांच्या फाशीची तारीख ठरली; चौथ्यांदा जारी केलं डेथ वॉरंट

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या