निर्भयाच्या दोषींनी आंतरराष्ट्रीय कोर्टाचं दार ठोठावलं, फाशी वाचवण्यासाठी नवी क्लृप्ती

निर्भयाच्या दोषींनी आंतरराष्ट्रीय कोर्टाचं दार ठोठावलं, फाशी वाचवण्यासाठी नवी क्लृप्ती

निर्भयाच्या दोषींची फाशीची शिक्षा वाचवण्यासाठी दोषींच्या वकिलाने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दार ठोठावले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 मार्च : निर्भया सामूहिक बलात्कारातील (Nirbhaya Gang Rape) दोषींनीं फाशीच्या शिक्षेविरोधात आता आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं (ICJ)  दार ठोठावलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवं वळणं लागलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दोषीची अंतिम याचिका फेटाळल्यानंतर २० मार्च रोजी निर्भया दोषींना फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर दोषींचे वकील  ए.पी. सिंग यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाला पत्र लिहिले आहे. यामध्ये 20 मार्च रोजी फाशी देण्यास बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच कनिष्ठ कोर्टाच्या सर्व नोंदी आतंरराष्ट्रीय न्यायालयाने मागवाव्यात जेणेकरून ते (दोषींचे वकील) आंतरराष्ट्रीय न्यायालयात आपली बाजू मांडू शकतील. हे पत्र नेदरलँडच्या दूतावासाला पाठविण्यात आले आहे. ते हे पत्र आयसीजेला पाठवतील. २० मार्च रोजी निर्भयाच्या दोषींना फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र यावर पुन्हा  सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल केलेली अंतिम याचिका आज फेटाळून लावण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुकेशची याचिका फेटाळून लावली आहे. मुकेश याने त्यांच्या भूल सुधार याचिकेवर पुन्हा सुनावणी घ्यावी, अशी मागणी केली होती. वकिलांनी त्याला अयोग्य सल्ला दिल्याचा दावा मुकेशने केला होता. मात्र कोर्टाने याचिका तर्कहीन म्हणून फेटाळून लावली.

संबंधित-निर्भया प्रकरण : नराधमांना 20 मार्चला फाशी; अखेरच्या क्षणी का बदलली फाशीची वेळ?

याचिकांवर याचिका, तारीख पे तारीख

निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना एकत्रितपणे 20 मार्च रोजी सकाळी फाशी देण्यात येईल. यापूर्वी 3 मार्च फाशीची तारीख ठरली होती. पण एक दोषी पवनकुमार गुप्ता याची क्युरेटिव्ह याचिका दाखल केल्याने सुनावणी सुरू झाली आणि फाशी रद्द झाली. पवनची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानंतर राष्ट्रपतींनीही त्याची दया याचिका फेटाळली आहे. पवन कुमारने आतापर्यंत सर्व कायदेशीर पर्यायांचा अवलंब केला असून आता त्यांची फाशी अटळ असल्याचे सांगितलं जात आहे.

पवनने गुन्हा केला तेव्हा तो अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. त्यापार्श्वभूमीवर त्याच्या फाशीच्या शिक्षेत बदल करुन जन्मठेप द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे. दुसरा दोषी अक्षय यानेसुद्धा नव्याने दया याचिका दाखल केली होती. पण त्याचीही याचिका फेटाळण्यात आली आहे.

First published: March 16, 2020, 5:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading