JOIN US
मराठी बातम्या / देश / अस्वलाने केला हल्ला, मित्र गेला पळून, मग काय? गडी एकटाच लढला

अस्वलाने केला हल्ला, मित्र गेला पळून, मग काय? गडी एकटाच लढला

सुमरन साय धनवार हा तिलाईडांड गावातील रहिवासी आहे. तो शेळ्या चारण्यासाठी जंगलात गेला होता

जाहिरात

जखमी सुमरन साय धनवार

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अनूप पासवान, प्रतिनिधी कोरबा, 28 जुलै : मैत्रीची व्याख्या, किस्से अनेकदा अभिमानाने सांगितले जातात. मात्र, एका व्यक्तीसोबत त्याच्याच एका मित्राने धोका दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणावर अस्वलाने हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाला तसाच सोडून जखमीच्या मित्राने घटना स्थळावरुन पळ काढला. दुसरीकडे या जखमी तरुणाच्या शौर्याचे कौतुक होत आहे. बांगो पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिलाईडांड गावातील एक तरुण अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. सुमरन साय धनुहार असे या तरुणाचे नाव आहे. तो आपल्या सहकाऱ्यासोबत शेळ्या चारण्यासाठी जंगलात गेला होता. मात्र, त्याच्यावर पाठीमागून अस्वलाने हमला गेला. यावेळी सुमरनचा मित्र त्याची साथ सोडून पळून गेला. यानंतर सुमरनने याने हिमतीने आपला जीव वाचवला. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सुमरन साय धनवार हा तिलाईडांड गावातील रहिवासी आहे. तो शेळ्या चारण्यासाठी जंगलात गेला होता. यावेळी सुमरान याच्यावर अस्वलाने मागून हल्ला केला. यामुळे तो जमिनीवर कोसळला आणि त्याने आपल्या साथीदाराला मदतीसाठी हाक मारायला सुरुवात केली. मात्र, संकटाच्या वेळी सुमरानचा साथीदार पाठ दाखवून घटनास्थळावरुन पळून गेला. यानंतर हिम्मत दाखवत सुमन ने कसातरी आपला जीव वाचवला. यानंतर अस्वलही याठिकाणाहून पळून गेले. यानंतर सुमरन पायीच घरी आला. यानंतर त्याने आपल्या साथीदाराला फटकारले. सुमरनला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. संकटाच्या वेळी मित्रच कामाला येतो. मात्र, सुमरनच्या या घटनेत मित्रानेच त्याची साथ सोडल्याने या घटनेची चर्चा परिसरात होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या