JOIN US
मराठी बातम्या / देश / काय आहे Soft tissue sarcoma ज्याच्याशी अरुण जेटलींची झुंज अपयशी ठरली?

काय आहे Soft tissue sarcoma ज्याच्याशी अरुण जेटलींची झुंज अपयशी ठरली?

अरुण जेटली यांची किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आली होती. पण त्या वेळी त्यांना आणखी एक दुर्धर आजार झाल्याचं गेल्या वर्षी लक्षात आलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 24 ऑगस्ट :  भाजपचे मोठे नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली Arun jaitely यांचं शनिवारी दुपारी दिल्लीत निधन झालं. दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेटली गेले अनेक दिवस आजारी होते. शेवटचे  काही दिवस त्यांना जीवनरक्षक यंत्रणेवर त्यांना ठेवलं होतं. त्यांची मूत्रपिंड खराब झाली होती आणि ते डायलिसीसवर होते. त्यानंतर गेल्या मे महिन्यात त्यांची किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आली होती.  पण त्या वेळी  त्यांना आणखी एक दुर्मीळ आजार झाल्याचं गेल्या वर्षी लक्षात आलं. त्यांच्या डाव्या पायाला एक दुर्मीळ कर्करोग झाला होता. या रेअर कॅन्सरचं नाव सॉफ्ट टिश्यू सारकोमा Soft tissue sarcoma असं आहे. Soft tissue sarcoma म्हणजे काय? सॉफ्ट टिश्यू सारकोमा हा एक दुर्मीळ प्रकारचा कर्करोग आहे. जगात हा कर्करोग झालेली फार कमी माणसं आहेत. त्यामुळे अर्थातच याचा खात्रीशीर इलाज अद्याप समोर आला नाही. संबंधित - ‘मी माझा बाप गमावला’, अरुण जेटलींच्या निधनानंतर भारतीय क्रिकेटरला भावना अनावर जेटलींनी या आजारावर अमेरिकेत जाऊनदेखील उपचार करून घेतले होते. पण अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली. शनिवारी 24 ऑगस्ट त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हा कॅन्सर पेशींच्या डीएनएमध्ये हळूहळू पसरतो आणि पेशींची गाठ झाल्याशिवाय लक्षात येत नाही. संबंधित वृत्त - जेटलींनी आजारी असताना कलम 370 च्या ऐतिहासिक निर्णयावर लिहला होता शेवटचा ब्लॉग त्यामुळे सॉफ्ट टिश्यू सारकोमा झपाट्याने शरीरभर फैलावतो. कुठल्याही भागापासून या कॅन्सरला सुरुवात होऊ शकते. हात, पाय, खांदा कुठलाही भाग या कॅन्सरने प्रभावित होऊ शकतो. यावरचा पहिला इलाज म्हणजे सर्जरी करून कॅन्सरग्रस्त पेशी काढून टाकणं. रेडिएशन आणि कीमोथेरपीनेही या कॅन्सरपेशी नष्ट केल्या जातात. पण कॅन्सर कुठे झालाय आणि तो शरीरात कुठे कुठे पसरला आहे यावर इलाज अवलंबून असतो. ‘असा नेता होणे नाही’; गिरीश महाजन, पृथ्वीराज चव्हाणांनी दिली प्रतिक्रिया

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या