JOIN US
मराठी बातम्या / देश / डॉक्टरांमुळे नाही तर Apple Watchमुळे वाचला जीव

डॉक्टरांमुळे नाही तर Apple Watchमुळे वाचला जीव

Apple Watchच्या मदतीनं Heart Rateची माहिती मिळाली. परिणामी एका व्यक्तीचा जीव वाचवणं शक्य झालं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

न्यूयॉर्क, 24 जून : हृदयविकाराच्या झटक्यापासून वाचण्यासाठी केवळ डॉक्टर हाच एकमेव पर्याय. पण, Apple Watchमुळे एका व्यक्तीचा जीव वाचला असेल तर? विश्वास नाही ना बसत? पण, अमेरिकेमध्ये डॉक्टर नाही तर चक्क Apple Watchमुळे एका व्यक्तीचा जीव वाचला आहे. एका रेस्टारंटमध्ये डॉक्टर बसले असता त्यांनी Apple Watch Series 4च्या मदतीनं एका व्यक्तीच्या शरीरातील आर्टरी फाइब्रिलेशनची माहिती करून घेतली. त्यामुळे वेळेवर उपचार करणं शक्य झालं आणि व्यक्तीचा जीव वाचला. आर्टरी फाइब्रिलेशन एक जीवघेणी अशी स्थिती आहे. यामुळे व्यक्तीला झटका येऊ शकतो आणि त्याचा जीव जाऊ शकतो. काही लोकांना याच्या लक्षणांबद्दल माहिती मिळत नाही. त्यामुळे मग जीवावर बेततं. पण, Apple Watchच्या मदतीनं Heart Rateची माहिती करून घेतली जाते. त्यामुळे उपचार करणं सोपं होतं. Heart Rateबद्दल माहिती करून घेण्यासाठी ECGचा पर्याय आहे. पण, Apple Watchच्या मदतीनं देखील त्याची माहिती करून घेतली जावू शकते. हे Apple Watch सध्या भारतात उपलब्ध नाही आहे.

संबंधित बातम्या

दबंग पोलीस अधीक्षक; बलात्काराच्या आरोपीला घातल्या गोळ्या यापूर्वी देखील वाचला आहे जीव हे Apple Watchमुळे यापूर्वी जपानमध्ये देखील 80 वर्षाच्या व्यक्तीचा जीव वाचला आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर व्यक्ती कोसळली. यावेळी Apple Watchच्या माध्यमातून 112 या नंबरला याबद्दलची माहिती दिली गेली. त्यानंतर रेक्यू टीमच्या मदतीनं या व्यक्तीचा जीव वाचवण्यात आला. VIDEO : ‘आता माझी सटकली’, बैलाने व्यापाऱ्याला लाथ मारून 8 फूट लांब फेकलं

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या