दबंग पोलीस अधीक्षक; बलात्काराच्या आरोपीला घातल्या गोळ्या

दबंग पोलीस अधीक्षक; बलात्काराच्या आरोपीला घातल्या गोळ्या

Rape In Uttar Pradesh Police officer Shot Accused and Arrested : उत्तर प्रदेशमध्ये चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे.

  • Share this:

रामपूर, 24 जून : एखाद्या चित्रपटाला शोभावी अशी घटना उत्तर प्रदेशातील रामपूर येथे घडली आहे. सहा वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलीस अधीक्षकांनी गोळ्या घातल्या आणि जेरबंद केलं. नाजिल असं या आरोपीचं आहे. नाजिलला पकडणं पोलिसांना शक्य नव्हतं. पण, रामपूरचे पोलीस अधीक्षक आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट अजल पाल शर्मा यांनी नाजिलच्या पायावर गोळ्या घातल्या आणि त्याला अटक केली. अजल पाल शर्मा यांच्यावर आता सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर देखील चिमुरडीला आणि कुटुंबियांना न्याय मिळाला अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.

दहशतवादी मसूद अजहर अ‍ॅडमिट असलेल्या पाकिस्तानी लष्कराच्या रूग्णालयात बॉम्बस्फोट

काय आहे प्रकरण

रामपूर येथे एका सहा वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या नाजिलनं केली. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांवर जोरदार टीका देखील झाली. मागील दीड महिन्यांपासून पोलीस नाजिलच्या शोधात होते. दरम्यान नाजिलला पकडण्यासाठी पोलिसांनी काही टीम्स तयार केल्या आणि त्या रवाना देखील केल्या होत्या.

यावेळी पोलिसांना आरोपीचा शोध देखील लागला. त्याला अटक करण्यासाठी पोलीस पोहोचले असता उत्तर प्रदेशमधील रामपूरमध्ये रविवारी रात्री पोलीस आणि स्थानिक गुंडांमध्ये चकमक उडाली. यावेळी पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या नाजिलच्या पायावर पोलीस अधीक्षक आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट अजय पाल शर्मा यांनी गोळ्या झाडून अटक केली. या कारवाईनंतर अजय पाल शर्मा यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

VIDEO: युतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद, आठवलेंनी दिला नवा फॉर्मुला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Rape
First Published: Jun 24, 2019 10:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading