JOIN US
मराठी बातम्या / देश / आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डींच्या काकांना CBIने केली अटक

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डींच्या काकांना CBIने केली अटक

सीबीआयने भास्कर रेड्डी यांना अटक केल्यानंतर कडप्पा जिल्ह्यातील पुलिवेंदुलातून हैदराबादला नेलं. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने भास्कर रेड्डी यांना १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हैदराबाद, 17 एप्रिल : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचे काका वायएस भास्कर रेड्डी यांना सीबीआयने अटक केली आहे. माजी खासदार विवेकानंद रेड्डी यांच्या हत्येप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. भास्कर रेड्डी हे वायएसआरसीपीचे खासदार वायएस अविनाश रेड्डी यांचे वडील आहेत. त्यांच्यावर कट रचणे, खून करणे आणि पुराव्यांज फेरफार छेडछाड करणे या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भास्कर रेड्डी यांना अटक केल्यानंतर त्यांचा मुलगा आणि कडप्पाचे खासदार वाय एस अविनाश रेड्डी यांनी म्हटलं की, वडील निर्दोष असल्याचं सिद्ध करण्यासाठी लढा देऊ. तपासात त्रुटी होत्या आणि कायद्याच्या कसोटीवर आरोप खरे ठरणार नाहीत. आम्हीच खरे सिद्ध होऊ. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. मी अजूनही सांगेन की न्याय मिळायला हवा. अतिक-अशरफ हत्याकांडात मोठा खुलासा; तिन्ही आरोपींना मिळाली होती सुपारी   सीबीआयने भास्कर रेड्डी यांना अटक केल्यानंतर कडप्पा जिल्ह्यातील पुलिवेंदुलातून हैदराबादला नेलं. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने भास्कर रेड्डी यांना १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. भास्कर रेड्डींच्या वकिलांनी न्यायालयात भास्कर यांची प्रकृती ठीक नसल्याचं सांगितलं. त्यांना रक्तदाबाचा त्रास असल्याची माहिती देण्यात आली. भास्कर रेड्डी यांच्या वैद्यकीय मदतीसाठी आणि इतर सुविधा पुरवाव्यात अशी मागणी करताच न्यायालयाने तुरुंग अधीक्षक प्रत्येक गोष्टीची काळजी घेतील असं म्हटलं. आंध्रचे दिवंगत मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांचे भाऊ विवेकानंद हे आंध्र विधानसभा निवडणुकीच्या काही आठवड्यांपूर्वी १५ मार्च २०१९ रोजी पुलिवेंदुला येथील त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळले होते. त्यानंतर हे प्रकरण एसआयटीकडून जुलै २०२० मध्ये सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं. सीबीआयने २६ ऑक्टोबरला या प्रकरणी आरोपपत्र दाखल केलं आणि ३१ जानेवारी २०२२ रोजी एक पुरवणी आरोपपत्रही दाखल केलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या