JOIN US
मराठी बातम्या / देश / क्या बात है! भारतीय डॉक्टरने अमेरिकेत इतिहास रचला; कोरोना रुग्णावर केली यशस्वी शस्त्रक्रिया

क्या बात है! भारतीय डॉक्टरने अमेरिकेत इतिहास रचला; कोरोना रुग्णावर केली यशस्वी शस्त्रक्रिया

ही शस्त्रक्रिया तब्बल 10 तास सुरू होती. या भारतीय डॉक्टरच्या पुढाकाराने कोरोनाबाधित मुलीचा जीव वाचू शकला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 12 जून : संपूर्ण देश कोरोनाव्हायरस रोखण्याच्या लढाईत गुंतलेला आहे. सामान्य असो वा विशेष, सर्वजण दिलेली जबाबदारी पार पाडत आपलं काम सुरू ठेवतं आहेत. यातच उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये जन्मलेल्या व अमेरिकत सराव करणाऱ्या डॉक्टर अंकित भरतने वैद्यकीय जगात इतिहास घडविला आहे. कोरोनादरम्यान भरत अमेरिकेतील रुग्णालयात शल्यचिकित्सकांच्या पथकाचे नेतृत्व करीत होता. त्याला कोरोना रूग्णावरील दोनही फुफ्फुस प्रत्यारोपण (double lungs transplant) करण्यात यश आले आहे. असं सांगितलं जात आहे की, डॉक्टरांना प्रथमच अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात यश मिळालं आहे. डॉ. भरत यांनी ज्या रुग्णावर हा उपचार केला आहे ती 20 वर्षांची मुलगी आहे. कोरोना विषाणूमुळे तिचे फुफ्फुस निरुपयोगी झाले होते. आपल्या डॉक्टर मुलाच्या कामगिरीमुळे मेरठमध्ये राहणारे त्याचे वडील आनंदी झाले आहे. डॉ अंकित भरत यांचे वडील म्हणतात की, आज मुलाने अभिमानाने माझ नाव मोठं केलं आहे. मेरठमधील रहिवासी आणि सध्या अमेरिकेत सराव करत असलेल्या अंकित भरत यांच्या नेतृत्वाखाली कोविड पॉझिटिव्ह 20 वर्षांची मुलगी दोन्ही फुफ्फुसांच्या प्रत्यारोपणात यशस्वी झाली आहे. शिकागो येथील या मुलीच्या दोन्ही फुफ्फुसांचे प्रत्यारोप करण्यात आले आहे. जर हा प्रत्यारोपण यशस्वी झाला नसता तर ही मुलगी वाचू शकली नसती. एक प्रकारे डॉ.अंकित भरत यांनी या मुलीला जीवनदान दिले आहे. मेरठमध्ये राहणारे डॉक्टर अंकित भरत यांचे वडील, जे स्वत: डॉक्टर देखील आहेत, ते म्हणतात की कोविड पेशंटची ही आतापर्यंतची सर्वात अवघड प्रत्यारोपण झाली आहे. डॉ. अंकितला हे ऑपरेशन करण्यास 10 तास लागले. या विषाणूमुळे महिलेच्या फुफ्फुसांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र अंकित न घाबरता आपलं काम करीत राहिला. हे वाचा- नायक नाही ही नायिका! 14 वर्षीय हिना झाली एक दिवसासाठी Sub Divisional Megistrate संपादन - मीनल गांगुर्डे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या