कोलकाता, 20 मे : कोरोनाचे संकट असतानाच अम्फान चक्रीवादळानं बंगालच्या उपसागरात रौद्र रुप धारण केलं आहे. यामुळे बंगाल, ओडिशा, आसाम आणि मेघालयात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. वादळानंतर मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल अशी भीतीही IMD च्या संचालकांनी व्यक्त केली आहे. किनारपट्टीवर अम्फानचा तडाखा बसायला सुरुवात होताच अनेक ठिकाणी वित्त हानी झाल्याचं दिसतं. काही ठिकाणी शेड, घरं पडल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यात कोलकात्यातील बेलियाघाटा भागात ओव्हरहेड केबलच्या शॉर्ट सर्किटचा व्हिडिओही आहे. कोलकात्यात जोरदार पाऊस पडत असून वारेही वेगाने वाहत असल्यानं अनेक ठिकांणी झाडांची आणि घरांची पडझड झाली आहे.
हवामान विभागाकडून चक्रीवादळाच्या स्थितीवर लक्ष दिलं जात असून यामुळे आपत्ती व्यवस्थापनासाठी मदत होत असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
बुधवारी सायंकाळच्या सुमारास वाऱ्याचा वेग 90 ते 100 किमी प्रतितास इतका असेल असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला. बालासोर, भद्रक, केद्रपारा, जगतसिंघपूर भागात याचा तडाखा बसू शकतो.
रात्रीपासून आसामा मेघालय या राज्यांमध्येही पाऊस पडेल असं हवामान विभागाने म्हटलं आहे. ओडिशातील पाऊस कमी होईल. अम्फान बांगलादेशमध्ये पोहोचल्यानंतर रौद्ररूप घेऊन याचा आसामला मोठा फटका बसेल असंही IMD ने म्हटलं आहे. चक्रीवादळाचा आणि वेगवान वाऱ्यामुळे समुद्रातही 4 ते 5 मीटर उंच लाटा उसळतील. साऊथ आणि नॉर्थ 24 परगाणा जिल्ह्यांत याचा धोका सर्वाधिक आहे. हे वाचा : भर दुपारी आलेल्या गूढ आवाजाने बंगळुरू हादरलं; काय झालं नेमकं?