JOIN US
मराठी बातम्या / देश / ऐकावं ते नवलच! दातांनी ओढलं विमान अन् जहाज; भारतीय महिलेनं नोंदवला जागतिक विक्रम

ऐकावं ते नवलच! दातांनी ओढलं विमान अन् जहाज; भारतीय महिलेनं नोंदवला जागतिक विक्रम

आपल्या आजूबाजूला अशा काही व्यक्ती असतात की, ज्यांच्यामध्ये असामान्य क्षमता असते. अशा क्षमता की, ज्यांची आपण कल्पनाही नाही करू शकत.

जाहिरात

दातांनी ओढलं विमान अन् जहाज

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली : आपल्या आजूबाजूला अशा काही व्यक्ती असतात की, ज्यांच्यामध्ये असामान्य क्षमता असते. अशा क्षमता की, ज्यांची आपण कल्पनाही नाही करू शकत. भारतातील अनेक व्यक्तींनी आपल्या अनोख्या क्षमतेच्या बळावर आपलं नाव जागतिक स्तरावर झळकवलं आहे. मध्य प्रदेशातील सीमा भदोरियाचा अशाच व्यक्तींमध्ये समावेश होतो. सीमाच्या नावाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये करण्यात आलेली आहे. सीमा आपल्या दातांनी कोणतीही अवजड वस्तू उचलू किंवा ओढू शकते. ‘अमर उजाला’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. सीमा भदोरिया मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिचे वडील कैलाश सिंह भदोरिया बस कंडक्टर आहेत. सीमा अभ्यासात फारशी हुशार नव्हती. तिनं वयाच्या 18 व्या वर्षी इयत्ता दहावी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. सीमा पाच भावंडांमध्ये सर्वांत लहान असून, तिनं कराटे आणि ज्युदोचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. वयाच्या 13 व्या वर्षी सीमा पहिल्यांदा प्रसिद्ध झाली. तेव्हा तिनं शेजाऱ्याची जीप दोरीनं बांधून ती आपल्या दातांनी ओढली होती.

26 जानेवारी 1995 रोजी तिनं मेटॅडोर गाडी आपल्या दातांनी ओढून संपूर्ण शहराला आश्चर्यचकित केलं होतं. यानंतर सीमानं अनेकवेळा मेटॅडोर आणि छोटे ट्रक ओढून दाखवले. तिच्या एका काँग्रेस कार्यकर्त्या नातेवाईकानं सीमाला प्रसिद्धी मिळवून देण्याचं ठरवलं. आरती असं नाव असलेल्या या नातेवाईक महिलेनं रेल्वे प्राधिकरणाची परवानगी घेतली. परवानगी मिळाल्यानंतर सीमानं ग्वाल्हेरमध्ये दातांनी 114 टन वजनाचं रेल्वे इंजिन ओढून दाखवलं. नंतर विमान आपल्या दातांनी ओढून सीमानं संपूर्ण भोपाळला चकित केलं. विमान ओढल्यामुळे सीमाचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवलं गेलं. विमानाशिवाय, सीमानं 450 टन वजनाचं जहाज देखील आपल्या दातांनी ओढलेलं आहे. घर चालवण्याचा 13 वर्षांचा अनुभव, हाऊस वाईफचा CV होतोय व्हायरल दरवर्षी जगभरात अनेक रेकॉर्ड बनवली जातात, ज्यांची जागतिक स्तरावर नोंद केली जाते. या जागतिक दर्जाच्या विक्रमांतर्गत कोणतीही व्यक्ती आपल्या अद्वितीय प्रतिभेनं जागतिक इतिहासात स्थान मिळवू शकते. असे रेकॉर्ड प्रस्थापित करण्यात भारतीयदेखील मागे नाहीत. आत्तापर्यंत अनेक भारतीयांनी जागतिक स्तरावर विक्रम नोंदवलेले आहे. मध्य प्रदेशातील सीमा भदोरिया त्यांच्यापैकीच एक आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात इजिप्तमध्ये राहणाऱ्या अश्रफ सुलेमान नावाच्या व्यक्तीनं 15,730 किलो वजनाचा ट्रक ओढून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्याने दाखवलेल्या अभूतपूर्व टॅलेंटसाठी त्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झालेली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या