नवी दिल्ली, 01 जून : देशात कोरोनाव्हायरसचा (Covid-19) प्रसार वेगानं होत असताना केंद्र सरकारनं लॉकडाऊन 5 आणि अनलॉक 1ची घोषणा केली. एकीकडे लॉकडाऊन हटवल्याता लोकांमध्ये आनंद आहे. तर दुसरीकडे यामुळं कोरोनाचा प्रसार आणखी वेगानं तर होणार नाही ना? याची भीती आहे. दरम्यान, भारताच्या ICART (India Covid19 Apex Research Team) या टीमनं लॉकडाऊन कधी आणि कसा हटवला जावा, याबाबत अभ्यास केला आहे. AIIMSच्या डॉक्टरांनी लॉकडाऊन हटवण्याची योग्य वेळ सांगितली आहे. या स्टडीमध्ये AIIMSचेडॉक्टर गिरीधर गोपाल परमेश्वरन, मोहकृत गुप्ता, सप्तर्षी सोहम मोहंता आणि त्यांच्या टीमचा समावेश आहे. या डॉक्टरांचे म्हणणे आहे की सरकारनं आता आपली आरोग्य सेवा प्रणाली मजबूत करण्याची आवश्यकता असेल. वाचा- Lockdown 5 : दुकानं उघडण्यासाठी असतील हे नियम, मॉल्ससह अजून काय राहणार बंद? लॉकडाऊन हटवल्यानंतर वाढू शकते कोरोनाबाधितांच्या संख्या अभ्यास करणाऱ्या टीमचं म्हणणं आहे की, देशात अचानक लॉकडाऊन हटवल्यास कोरोनाचा प्रसार वाढण्याची चिंता आहे. जगात ज्या गतीनं कोरोनाबाधितांच्या संख्या वाढत आहे, तशी परिस्थिती भारतात नाही आहे. भारतात हा पीक कमी होत आहे. मात्र लॉकडाऊन हटवल्यास लोकं घराबाहेर पडतील, यामुळं कोरोनाचा प्रसार अधिक वेगानं होऊ शकतो. देशातील कोरोना विषाणूच्या रुग्णांच्या दैनंदिन जमावाच्या 7 दिवसांच्या रोलिंग एव्हरेजमध्ये अद्याप घट दिसून आलेली नाही. अशा परिस्थितीत लॉकडाऊन शिथिल करणे योग्य नाही. वाचा- मोठी बातमी : लॉकडाऊन 5 मध्ये असा खुला होणार महाराष्ट्र, जाहीर केली नवी नियमावली पुन्हा येऊ शकतो कोरोना चीनमधील परिस्थिती पाहता टीमनं चीनमध्ये हा संसर्ग जवळजवळ संपला होता, मात्र कोरोनानं पुन्हा शिरकाव केला. 13 फेब्रुवारी रोजी चीनमध्ये 15,133 प्रकरणे नोंदली गेली. दोन महिन्यांनंतर त्यांनी लॉकडाऊन हटवला. ज्यामुळे वारंवार होणार्या संसर्गाची प्रकरणे लवकरच नियंत्रित केली जाऊ शकतात. ते म्हणाले, म्हणूनच या अभ्यासानुसार असे दिसून येते की जर एखादा देश लॉकडाऊन शिथिल केला तर पुन्हा कोरोनाचा शिरकाव होऊ शकतो. वाचा- आजपासून बदलणार तुमच्या रोजच्या जीवनातील महत्त्वाचे नियम, खिशाला बसणार कात्री?