JOIN US
मराठी बातम्या / देश / भारतात कोरोनाचं कम्युनिटी ट्रान्समिशन झालं, तज्ज्ञांनी खोडला सरकारचा दावा

भारतात कोरोनाचं कम्युनिटी ट्रान्समिशन झालं, तज्ज्ञांनी खोडला सरकारचा दावा

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने 3 लाखांचा टप्पा पार केला असून भारतात आतापर्यंत एकूण 3,08,993 जणांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 13 जून:  देशात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. दर दिवशी किमान दहा हजार रुग्णांची भर पडत आहे. परिस्थिती गंभीर असतानाच देशात व्हायरसचं कम्युनिटी ट्रान्समिशन झालं की नाही अशी चर्चा सुरू आहे.Indian Council of Medical Research (ICMR) चे संचालक बलराव भार्गव यांनी देशात ही स्टेज आली नाही असा दावा केला होता. भार्गव यांचा दावा तज्ज्ञांनी खोडून काढला असून देशात व्हायरसचं कम्युनिटी ट्रान्समिशन झालं हे सरकारने मान्य करावं असं म्हटलं आहे. अनलॉकमुळे आता देशाच्या ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. संख्या झापाट्याने वाढत आहे. त्यामुळे देशात कम्युनिटी ट्रान्समिशन झालं हे स्पष्ट होतं असं मत AIIMSचे माजी संचालक एम.सी. मिश्रा यांनी व्यक्त केलंय. त्यामुळे सरकारने हे मान्य करून तातडीने उपाययोजना कराव्यात असं मतही त्यांनी त्यांनी व्यक्त केलं. देशात फार पूर्वीच कम्युनिटी ट्रान्समिशन सुरू झालं असं मत प्रसिद्ध Virologist शाहीद जमील यांनी व्यक्त केलं. ICMR ने केलेल्या अभ्यासातूनच हे दिसून येते. मात्र ते मान्य करत नाहीत असं म्हटलं आहे. लॉकडाऊनमध्ये गेली नोकरी, 30 वर्षांपासून शिकवणाऱ्या शिक्षकांवर मजुरीची वेळ देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने 3 लाखांचा टप्पा पार केला असून भारतात आतापर्यंत एकूण 3,08,993 जणांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 8 हजार 884 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासामध्ये सर्वाधिक 11458 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. डोळ्यादेखत पत्त्यासारखी कोसळली 3 मजली इमारत, पाहा थरारक VIDEO भारतात मागील 24 तासांमध्ये 386 लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. एकीकडे ही काळजी वाढवणारी आकडेवारी समोर येत असताना कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येने काहीसा दिलासा मिळाला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 49.94 टक्के इतका असून आतापर्यंत देशभरात 1,54,330 बरे झाले आहेत. संकलन - अजय कौटिकवार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या