राफेल विमानबाबत काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसमे ट्विट करीत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की – राफेलच्या आगमनावर वायूसेनेला शुभेच्छा देत तुम्ही भाजप सरकारच्या गोंधळावर प्रश्न उपस्थित करत असाल तर समजा अजूनही तुमच्यात देशभक्ती जिवंत आहे..जय हिंद
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : शेती विधेयकावरून राज्यसभेत काँग्रेसने जोरदार गोंधळ घातला होता. त्यामुळे आज राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी काँग्रेसच्या खासदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे. काँग्रेसचे खासदार राजीव यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. राजीव सातव यांच्यासह आठ खासदारांवर कारवाई करण्यात आली आहे. राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी ही कारवाई केली आहे. काँग्रेसच्या आठही खासदारांचे आगामी 7 दिवसांसाठी निलंबन करण्यात आले आहे. पावसाळी अधिवेशनात वादग्रस्त शेती विधेयकावरून जोरदार गदारोळ पाहण्यास मिळाला. राज्यसभेत कृषी मंत्री नरेंद्र तोमर हे बोलायला उभे राहिले असता विरोधकांनी एकच गोंधळ घातला होता.
राज्यसभेत सभागृहाची वेळ वाढविण्याच्या मुद्यावरून एकच वाद पेटला होता. कृषी मंत्र्यांनी दुसऱ्या दिवशी उत्तर देण्याची विरोधी पक्ष नेते गुलाम नवी आझाद यांनी मागणी केली होती. पण, या गोंधळात कृषी मंत्री नरेंद्र तोमर देत आहे चर्चेला उत्तर देत होते. त्यावेळी झालेल्या गोंधळ उपसभापतींसमोर माईक तोडण्याचाही प्रयत्न झाला. दरम्यान, वादग्रस्त ठरलेले शेती विधेयक अखेर गोंधळातच राज्यसभेत मंजूर करण्यात आले. राज्यसभेत मोठ्या गोंधळात कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी शेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक आणि शेतकरी (सशक्तिकरण आणि संरक्षण) मूल्य आश्वासन आणि कृषि सेवा विधेयक सादर केले. या दोन्ही विधेयकांवर मतदान घेऊन मंजुरी देण्यात आली.