JOIN US
मराठी बातम्या / देश / पुण्यातील एक अनोखं लग्न! इन्स्पेक्टर यांनी पार पाडलं बापाचं कर्तव्य तर पोलीस झाले वधू-वराचा परिवार

पुण्यातील एक अनोखं लग्न! इन्स्पेक्टर यांनी पार पाडलं बापाचं कर्तव्य तर पोलीस झाले वधू-वराचा परिवार

लॉकडाऊनमुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र अशाही परिस्थितीत कोरोना योद्धा त्यांच्या मदतीसाठी धावून जात आहेत

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 04 मे : कोरोनाच्या (Coronavirus) संकटात देशभरात 17 मेपर्यंत लॉकडाऊन (Lockdown) वाढवला आहे. त्यामुळे लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यादरम्यान पुण्यात (Pune Police) असंच एक अनोखं लग्न पार पडलं. ज्यामध्ये पोलिसांनी कुटुंबीयांची भूमिका पार पाडली. इतकचं नव्हे तर पोलिसांनी कन्यादानही केलं. लग्नानंतर नवरदेवाने सांगितले की लॉकडाऊनमुळे त्याचे आई-वडील लग्नाला पोहोचू शकले नाही. यावेळी पुणे पोलिसांनी सर्व विधी पार पाडले. इन्स्पेक्टर यांनी डीसीपी आणि कमिश्नर यांच्याकडून परवानगी घेत लग्नासाठी मदत केली. कन्यादानही त्यांनीच केले. यावर वर-वधुने आनंद व्यक्त केला. यावर वर म्हणाला की,’ इन्स्पेक्टर प्रकाश आणि त्यांच्या संपूर्ण टीममुळे आमचं लग्न होऊ शकलं. मी त्यांचा आभारी आहे.'

वर हा आयटी क्षेत्रात काम करतो तर वधु ही व्यवसायाने डॉक्टर आहे. या जोड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. सध्या  देशात कोरोनाचा कहर वाढत असल्याने लॉकडाऊन 17 मेपर्यंत वाढवला आहे. यादरम्यान ग्रीन झोनमधील नागरिकांना काहीअंशी सूट देण्यात आली आहे. मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्यात आली आहे. संबंधित - कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यात होणार ‘प्लाझ्मा थेरेपी’, ICMRने घेतला मोठा निर्णय

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या