JOIN US
मराठी बातम्या / देश / कर्तव्यावर असलेल्या कोरोना योद्ध्याला भरधाव ट्रकने चिरडलं; जागीच सोडले प्राण

कर्तव्यावर असलेल्या कोरोना योद्ध्याला भरधाव ट्रकने चिरडलं; जागीच सोडले प्राण

चेक पोस्टवरील पोलिसांचं बॅरिकेटिंग तोडून ट्रक पोलिसांच्या टीमच्या अंगावर गेला…

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बरेली, 6 मे : लॉकडाऊनदरम्यान शहराच्या सीमेवर गाड्यांची तपासणी करणाऱ्या पोलिसाला एका डीसीएमने धडक दिली. या अपघातात पोलीस हेड कॉन्स्टेबल याचा जागीच मृत्यू झाला. आज कोरोनासारख्या भयंकर परिस्थितीत लाखो कोरोना योद्धा जिवाची बाजी लावू काम करीत आहे. अनेकजण लॉकडाऊनचा फायदा घेत बेकायदेशीर कामे वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांच्या प्रवासावर निर्बंध असतानाही अनेकजण बेकायदेशीररीत्या प्रवास करीत आहे. यासाठी महामार्गावर पोलिसांची गस्त असते. येथे चेक पोस्टवर कोरोना योद्ध्याला भरधाव ट्रकने चिरडले. या अपघातात एक इन्स्पेक्टर रॅंकचा अधिकारीही गंभीर जखमी झाला आहे. त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांनी दुसरीकडे ट्रक ताब्यात घेतला असून मालकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मीरगंज ठाणे क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्गावरील चेक पोस्टवर पोलिसांची टीम वाहनांची तपासणी करीत होती. यादरम्यान रामपूर येथून एक ट्रक भरधाव वेगाने येत होता. पोलिसांच्या टीमने त्याला थांबवण्याचा इशारा केला. मात्र डीसीएमने वेग अधिक वाढवला. पोलिसांना काही कळायच्या आता ट्रक बॅरिकेडिंग तोडून पोलीस कर्मचाऱ्यांच्या चिरडून पुढे गेला. यामध्ये उत्तर प्रदेश पोलिसांच्या एक हेड कॉन्स्टेबलचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले इन्स्पेक्टर यावेळी जखमी झाले आहेत. हेडकॉन्स्टेबल सत्यप्रकाश यांचं बलिदान हेड कॉन्स्टेबल सत्य प्रकाश शर्मा यांनी ड्यूटी करीत असताना प्राणांचे बलिदान दिले. त्यांनी पोलीस लाइनमध्ये अंतिम सलामी देण्यात आली. त्यानंतर त्यांचे पार्थिक शर्मा यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले. शहीद सत्य प्रकाश यांचा संबंपरिवार मुरादाबादमध्ये राहतो. संबंधित - आर्थिक मंदीत दारुची धुंदी; 2 दिवसात 43 कोटी 75 लाखांची मद्य विक्री

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या