Home /News /maharashtra /

आर्थिक मंदीत दारुची धुंदी; 2 दिवसात 43 कोटी 75 लाखांची मद्य विक्री

आर्थिक मंदीत दारुची धुंदी; 2 दिवसात 43 कोटी 75 लाखांची मद्य विक्री

राज्यात दारू विक्रीस परवानगी दिल्यानंतर मद्यपींनी दुकानांबाहेर मोठी रांग लावली होती

    मुंबई, 6 मे : देशभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढत असताना गेल्या 40 दिवसांपासून लॉकडाऊन असल्याने सर्व कामं ठप्प आहेत. अशा परिस्थिती अर्थव्यवस्थेबाबतही चिंतेचं वातावरण आहे. असे असतानाही दारू विक्री मात्र तेजीत आहे. देशात आर्थिक मंदी असल्याचे सांगत असताना दुसरीकडे मात्र गेल्या दोन दिवसात मद्यविक्रीने मोठा आकडा गाठला आहे. मद्यविक्रीसाठी सशर्त परवानगी दिल्यानंतर 43 कोटी 75 लाख रुपयांची दारू विक्री झाली आहे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. राज्य शासनाने 3 मे 2020 पासुन लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली होती. मद्यविक्रीसाठी सशर्त परवानगी दिल्यानंतर आतापर्यंत अंदाजे 12.50 लाख लिटर दारुची विक्री झाली आहे. याची क़िंमत साधारण 43 कोटी 75 लाख रुपये असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी दिली. गेल्या 40 हून अधिक दिवसांपासून सर्व कामं बंद असल्याने आर्थिक धोका निर्माण झाला आहे. लोकांच्या हाताला काम नसल्याने भविष्यात पैशांची अडचण निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ➢ किरकोळ मद्यविक्री परवानगी असलेल्या जिल्हयांची नावे :- 1. ठाणे, 2. पालघर, 3. रायगड, 4. पुणे, 5. सोलापूर 6. अहमदनगर, 7. कोल्हापुर, 8. सांगली, 9. सिंधुदुर्ग, 10. नाशिक, 11. धुळे, 12. नंदुरबार, 13. जळगाव, 14. भंडारा, 15. यवतमाळ, 16. अकोला, 17. वाशिम व 18. बुलढाणा. ➢ किरकोळ मद्यविक्रीची परवानगी न दिलेल्या जिल्हयांची नावे :- 1.सातारा, 2. औरंगाबाद, 3. जालना, 4. बीड, 5. नांदेड, 6. परभणी, 7. हिंगोली, 8. नागपुर, व 9. गोंदिया. ➢ किरकोळ मद्यविक्रीची परवानगी नाकारण्यात आली :- 1. मुंबई शहर, 2. मुंबई उपनगर, 3. उस्मानाबाद, व 4. लातुर. ➢ किरकोळ मद्यविक्री सुरू होण्याची शक्यता असलेले जिल्हे:-. 1. रत्नागिरी, 2. अमरावती राज्यात 24 मार्च, 2020 पासुन राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. राज्यात शेजारील राज्यांमधुन होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्वविभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असुन 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी/कर्मचारी तैनात आहे. अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24 X 7 सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. यासाठी टोल फ्री क्रमांक - १८००८३३३३३३ व्हाट्सअँप क्रमांक - ८४२२००११३३.हा असून हा ई-मेल - commstateexcise@gmail.com आहे. संबंधित -महाराष्ट्रात पहिल्यांदाच दारू घरपोच देण्याचे आदेश निघाले; या जिल्ह्यात करणार सोय
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या